महाराष्ट्र

maharashtra

भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेले कास्य पदक, सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही - संदीप सिंग

By

Published : Aug 9, 2021, 8:45 PM IST

Hockey bronze is worth in gold, it fulfilled long cherished hope: Sandeep Singh
भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलं कास्य, सुवर्ण पेक्षा कमी नाही - संदीप सिंग ()

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेले कास्य पदक हे सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही, असे हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी सांगितलं की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेले कास्य पदक हे सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. दरम्यान, हरियाणा सरकार 13 ऑगस्ट रोजी आपल्या अॅथलिटचा सन्मान सोहळा करणार आहे.

संदीप सिंग यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, आम्ही 13 ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. ज्यात आमच्या राज्यातील अॅथिलिट ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांचा रोख बक्षिस देत सन्मान केला जाणार आहे.

दरम्यान, हरियाणा सरकारने सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला सहा करोड तर रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियाला चार करोड रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. याशिवाय कास्य पदक विजेता भारतीय पुरूष संघात सहभागी हरियाणाच्या खेळाडूंना प्रत्येकी अडीच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला हॉकी संघातील हरियाणाच्या खेळाडूंना सरकार प्रत्येकी 50 लाख रुपये देणार आहे.

संदीप सिंग म्हणाले, आम्ही फक्त जाहीर केलेली बक्षिसे देत नाही आहोत, याशिवाय आणखी बक्षिस देत आहोत. आम्ही फक्त विजेत्या खेळाडूंचाच सन्मान करणार नाही तर सर्व सहभागी खेळाडूंचा देखील सत्कार आम्ही करू. आम्ही ऑलिम्पिकला जाणाऱ्या राज्यातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षिस म्हणून देणार आहेत.

हरियाणा राज्य सर्व खेळामध्ये पुढे आहे. आम्ही खेळाडूंना सर्व सुविधा देत आहोत. याचा फायदा देशाला होत आहे. जे पदक आता आलेले आहेत, त्यापाठीमागे हरियाणा सरकारची योजना आहे. जर पदके पहिली तर हरियाणाच्या खेळाडूंनी सर्वात जास्त पदकं जिंकली. खेळात आमचे राज्य सतत विकास करत असून आम्ही नव्या टॅलेंटचा शोध घेत असल्याचे देखील संदीप सिंग म्हणाले.

आपण भारतात 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्यासाठी उतरलो होते. तेव्हा आपल्या हाती निराशा लागली. त्यावेळेपासून ती कायम आहे. माझ्यासाठी भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेला कास्य पदक हा सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. कारण भारतीय हॉकी संघाने अशी कामगिरी केली आहे, ज्याची आशा संपूर्ण देशाला होती, असे देखील संदीप सिंग यांनी सांगितलं.

हेही वाचा -नीरज चोप्रा चाहत्यांच्या गराड्यात अडकला, सुरक्षेचा उडाला बोजवारा

हेही वाचा -सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे भारतात शानदार स्वागत, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details