महाराष्ट्र

maharashtra

Virat Kohli Food : कोहलीला आहे कारल्याचा तिटकारा! तर 'हा' आहे त्याचा आवडता पदार्थ

By

Published : Feb 21, 2023, 6:35 AM IST

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. एका व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या आवडत्या आणि नावडत्या पदार्थांबद्दल सांगितले आहे. तसेच कोहलीने सांगितले की, त्याने एकदा चक्क तळलेला किडा खाल्ला होता!

Virat Kohli
विराट कोहली

नवी दिल्ली :भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली पक्का दिल्लीकर आहे. त्यामुळेच त्याला छोले भटुरे खायला आवडतात. कोहली जेव्हा जेव्हा दिल्लीत येतो तेव्हा तो छोले भटूऱ्यांची चव नक्कीच चाखतो. नुकत्याच दिल्लीत खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीने छोले भटुरे खाल्ले. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आवडत्या तसेच नापसंत गोष्टींबद्दल बोलतो आहे.

कोहलीने खाल्लेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती? : या व्हिडिओमध्ये विराट कोहली काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसतो आहे. कोहलीला विचारले जाते की त्याने आयुष्यात खाल्लेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती आहे? तर कोहली याला उत्तर देतो. कोहली म्हणाला की, तो मलेशियामध्ये होता. त्याने चुकून एक डिश ऑर्डर केली. बहुधा तो किडा होता. तो तळलेला होता. त्याने तो खाल्ला आणि त्याला त्या डिशचा फारच तिरस्कार झाला.

कोहलीला या गोष्टीचा तिटकारा : सर्वांना माहीत आहे की कोहली हा त्याच्या डायटच्या बाबतीत किती कर्मठ आहे. फिटनेस मेंटेन करण्यासाठी त्याने शाकाहार अवलंबला आहे. असे असूनही कोहलीला देखील कधी कधी त्याच्या डायट प्लॅनला चिट करून त्याच्या आवडीचे पदार्थ खायला आवडतात. तो या व्हिडीओमध्ये सांगतो की, छोले-भटूरे हे त्याचे त्या प्रकारचे जेवण आहे. त्याला जेव्हा जेव्हा त्याच्या कठोर डायट प्लॅन पासून आराम हवा असतो तेव्हा तो हमखास छोले भटूरे खातो. या सोबतच तो कडू कधीच खात नसल्याचेही सांगतो. त्याला कारल्याचा तिटकारा आहे, असे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे.

कोहलीच्या नावे आणखी एक विक्रम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 धावा पूर्ण केल्या आहेत. 50 पेक्षा जास्त सरासरीने 25000 धावांचा आकडा गाठणारा तो जगातील पहिला खेळाडू आहे. तसेच कोहली सर्वात जलद 25000 धावा करणारा फलंदाज बनला आहे.

हेही वाचा :ICC Women's World Cup 2023 : डकवर्थ लुईस पद्धतीने आयर्लंडचा ५ धावांनी पराभव करत भारत टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details