महाराष्ट्र

maharashtra

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित राखली

By

Published : Jun 20, 2021, 3:00 AM IST

Updated : Jun 20, 2021, 8:30 PM IST

स्नेह राणा अष्टपैलू कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंड संघाला प्रतिउत्तर देताना भारतीय संघ पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शेफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

ब्रिस्टल- स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी आणि शफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला. स्नेह राणाच्या नाबाद अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णित राखली. राणाने (१५४ चेंडूंत १३ चौकारांसह नाबाद ८० धावा) तानिया भाटियाच्या साथीने नवव्या विकेटसाठी १०४ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे भारताला दुसऱ्या डावात १२१ षटकांत ८ बाद ३४४ धावा करण्यात यश मिळाले. भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. त्याआधी सलग दुसरे अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा ६३ धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी डगमगू लागली होती. दीप्तीने पूनम राऊतसह (३९ धावा) तिसऱ्या विकेटसाठी जोडल्या व ७२ धावांची भागीदारी केली. पण सोफी एस्सेलस्टोनने दीप्तीचे (५४ धावांवर ) आव्हाण संपुष्टात आणले. कर्णधार मिताली राज (४) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (८) धावांवर बाद झाल्याने त्यांनी निराशा केली.

भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित राखली

स्नेह राणा

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. इंग्लंड संघाला प्रतिउत्तर देताना भारतीय संघ पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाला. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शेफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पहिल्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरी

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शफाली वर्मा आणि स्नेह राणा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दुसर्‍या डावात शफाली वर्माने ६३, दीप्ती शर्माने ५४, पूनम राऊतने ३९, स्नेह राणाने नाबाद ८० व तानिया भाटियाने नाबाद ४४ धावा केल्या. सामन्यात २४० धांवात ८ गडी विकेट गमावल्याने भारतीय संघ पराभवाच्या मार्गावर होता, पण स्नेह राणा आणि भाटियाने १०४ धावांची भागीदारी करून भारताला पराभवापासून वाचवले. स्नेह राणाने अष्टपैलू कामगिरी करून भारतीय संघाला पराभवापासून वाचवले.

संक्षिप्त धावफलक –

  • नाणेफेक – इंग्लंड (फलंदाजी)
  • इंग्लंड पहिला डाव – ३९६ ९ (डाव घोषित)
  • भारत पहिला डाव – २३१/१०
  • भारत दुसरा डाव (फॉलोऑन) – ३४४/८ (सामना अनिर्णित)
Last Updated :Jun 20, 2021, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details