महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाज आयपीएल स्पर्धेतून बाहेर

By

Published : May 9, 2022, 10:03 PM IST

या मोसमात मुंबई इंडियन्सच्या संघाने मोठ्या कष्टाने विजयाचा मार्ग पकडला होता. संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले. पण, कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का बसला. त्याचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Suryakumar
Suryakumar

नवी मुंबई:मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव ( Batsman Suryakumar Yadav ) सोमवारी त्याच्या डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) 2022 मधून बाहेर पडला आहे. भारतीय फलंदाजाने पाच वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई संघासाठी या हंगामात आठ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने तीन अर्धशतकांसह 43.29 च्या सरासरीने 303 धावा केल्या आहेत.

आयपीएलकडून जारी करण्यात आलेल्या मीडिया रिलीझनुसार, 6 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान सूर्यकुमारला दुखापत ( Suryakumar Yadav injured ) झाली होती. मुंबई इंडियन्सने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, सूर्यकुमार यादवच्या डाव्या हाताच्या मांसपेशिमध्ये ताण आला आहे. ज्यामुळे तो चालू हंगामातून बाहेर झाला ( Suryakumar ruled out IPL ) आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाशी संपर्क साधल्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

सूर्यकुमार या मोसमात मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) पहिल्या दोन सामन्यातही खेळला नव्हता. फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला हेअरलाइन फ्रॅक्चरचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तो पुनर्वसनासाठी (रिहॅबिलिटेशन) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत होता.

खराब फिटनेसमुळे सूर्यकुमार यादव काही सामन्यांनंतरच मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. टीम इंडियाकडून खेळताना तो जखमी झाला, त्यानंतर त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे लागले. एनसीएची परवानगी मिळाल्यानंतरच सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये सामील झाला होता. आता सूर्यकुमार यादव किती दिवसात तंदुरुस्त होतो हे पाहावे लागेल, कारण आयपीएल संपल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकाही खेळायची आहे.

हेही वाचा -MS Dhoni eats his bat : धोनीच्या बॅट चावण्याच्या सवयीवरुन उठला पडदा, हे आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details