महाराष्ट्र

maharashtra

Ranji Trophy 2022 QF : क्रीडामंत्र्याच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगालने गाठली उपांत्य फेरी

By

Published : Jun 10, 2022, 7:42 PM IST

झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होता, त्यात तिवारीने 136 धावा केल्या.

Manoj Tiwari
Manoj Tiwari

बंगळुरू: रणजी करंडक स्पर्धेतील ( Ranji Trophy 2022 ) उपांत्यपूर्व सामना शुक्रवारी बंगाल विरुद्ध झारखंड संघात पार पडला. या सामन्यात बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी ( Bengal Sports Minister Manoj Tiwari ) यांनी 88 वर्षात रणजी ट्रॉफीमध्ये इतर कोणीही करू शकले नाही, अशी कामगिरी केली आहे. ते राज्याचे क्रीडा मंत्री म्हणून शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरले आहेत.

झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक ( Bengal reached in the semi-finals ) मारली. पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होता, त्यात मनोज तिवारीने 136 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि दोन षटकार लगावले.

शाहबाज अहमदने 46, अनुस्तुप मजुमदारने 38 आणि अभिषेक पोरेलने 34 धावा केल्या. या तिघांनीही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली होती. एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत बंगालने पहिल्या डावात 7 बाद 773 धावा केल्या होत्या. ज्यामध्य त्यांच्या नऊ फलंदाजांनी अर्धशतके झळकावून प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 250 वर्षांच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला.

झारखंडकडून शाहबाज नदीमने 59 धावांत पाच बळी घेतले. त्याचवेळी विराट सिंगने ( Batsman Virat Singh ) पहिल्या डावात 136 धावा केल्या. उपांत्य फेरीत बंगालचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईची लढत उत्तर प्रदेशशी होणार आहे. हे दोन्ही सामने 14 जूनपासून सुरु होणार आहेत.

हेही वाचा -Ipl Online Media Rights : ...जर असे झाले तर हॉटस्टारवर नव्हे, तर ॲमेझॉनवर दिसणार आयपीएल

ABOUT THE AUTHOR

...view details