महाराष्ट्र

maharashtra

BCCI President Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या ट्विटने गोंधळ; बीसीसीआय प्रमुखपद सोडले नाही - जय शाहचे वक्तव्य

By

Published : Jun 1, 2022, 6:02 PM IST

Updated : Jun 1, 2022, 7:17 PM IST

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांना क्रिकेटमध्ये 30 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याने बुधवारी (1 जून) ट्विट करून माहिती दिली की, तो नवीन इनिंगला सुरुवात करू शकतो. मात्र, गांगुलीने याबाबत सविस्तर काहीही सांगितले नाही.

Sourav Ganguly
Sourav Ganguly

हैदराबाद:टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI president Sourav Ganguly ) याच्याबाबत नवीन अटकळ बांधली जात आहे. सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपद सोडू शकतो अशी चर्चा आहे. सौरव गांगुलीच्या एका ट्विटर पोस्टनंतर ही अटकळ बांधली जात आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे. जे मला वाटते की, कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मी माझ्या जीवनाच्या या अध्यायात प्रवेश करत असताना तुम्ही मला पाठिंबा देत राहाल अशी आशा आहे.

सौरव गांगुलीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असे ट्विट केले होते, ज्यानंतर त्यांनी आपले पद सोडल्याची चर्चा सुरू झाली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी सांगितले की, गांगुलीने पद सोडलेले नाही.

गांगुलीने ट्विट करताना लिहिले की, मी 1992 मध्ये माझा प्रवास सुरू केला. 2022 हे वर्ष माझ्या क्रिकेट कारकिर्दीला 30 वर्षे पूर्ण करण्याचे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचवणाऱ्या प्रत्येक समर्थकाचे मी आभार मानू इच्छितो.

ते म्हणाले, आज मी अशी एक गोष्ट सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याचा खूप लोकांना फायदा होईल अशी आशा आहे. माझ्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात मला तुमची साथ मिळेल अशी आशा आहे.

गांगुली आणि अमित शहा यांची भेट -

गृहमंत्री अमित शहा यांनी 6 मे रोजी गांगुली यांची भेट घेतली ( Meeting with Ganguly and Amit Shah ) होती. शाह गांगुलीच्या कोलकाता येथील निवासस्थानी डिनरसाठी पोहोचले होते. या दोघांच्या भेटीनंतर गांगुली भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या वर्षीही याची चर्चा झाली होती, पण नंतर गांगुलीने भाजपमध्ये जाण्यास नकार दिला होता.

गांगुलीची क्रिकेट कारकीर्द -

सौरव गांगुलीने 1992 मध्ये ब्रिस्बेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर 1996 मध्ये लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. गांगुलीचा शेवटचा कसोटी सामना 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात झाला होता. 2007 मध्ये ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गांगुलीने 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या. त्याचबरोबर 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या 11,363 धावा आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 41.02 होती. भारताच्या माजी कर्णधाराने कसोटीत 16 आणि एकदिवसीय सामन्यात 22 शतके झळकावली आहेत.

हेही वाचा -T20 World Cup : आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक पात्रता फेरी 3 जूनपासून होणार सुरू

Last Updated :Jun 1, 2022, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details