महाराष्ट्र

maharashtra

Saurav Ganguly on Bumrah Injury : विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणे कठीण - सौरव गांगुली

By

Published : Mar 14, 2023, 11:03 AM IST

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने जखमी जसप्रीत बुमराहच्या विश्वचषक खेळण्याबाबत शंका उपस्थित केली आहे. विश्वचषकापूर्वी बुमराहला तंदुरुस्त होणे कठीण असल्याचे त्याने म्हटले आहे.

Saurav Ganguly on Bumrah Injury
सौरव गांगुली

नवी दिल्ली :आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानावर होणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जसप्रीत बुमराहच्या विश्वचषकासाठी उपलब्धतेवर शंका व्यक्त केली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. बुमराह सध्या न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रिया करत आहे. वेगवान गोलंदाज पूर्णपणे बरा होण्यासाठी आणि खेळण्यासाठी तसेत तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे 6 महिने लागतील.

विश्वचषक सुरू होण्याच्याआधी बुमराह परतणार :विश्वचषकापूर्वी बुमराहला तंदुरुस्त राहणे कठीण आहे. भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला की, तो 6 महिन्यांनंतर मैदानात परतणार आहे. विश्वचषक सुरू होण्याच्याआधी बुमराह परतणार आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी तंदुरुस्त राहणे त्याच्यासाठी कठीण जाईल, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्षांचे मत आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होण्यासाठी आणि मैदानावर परतण्यासाठी किती वेळ लागू शकतो, याविषयी गांगुली म्हणाला, 'मैदानावर परतणे अनेक घटकांवर अवलंबून असते. शस्त्रक्रिया कशी झाली? किंवा इतर गोष्टींवर हे अवलंबून आहे.

क्रिकेटपटूचा फिटनेस त्यांच्यासाठी प्रथम :भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली याने जखमी जसप्रीत बुमराहच्या विश्वचषक खेळण्याबाबत शंका उपस्थित केली आहे. जसप्रीत बुमराहला पुनरागमन करून विश्वचषक खेळणे कठीण असल्याचे गांगुलीला वाटते. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराह आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) स्पष्ट केले आहे की, क्रिकेटपटूचा फिटनेस त्यांच्यासाठी प्रथम येतो. त्याच्या मते, विश्वचषकापूर्वी क्रिकेटपटूला दुखापत झाली असली तरी त्याच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. गरज भासल्यास मंडळ त्यासाठी व्यवस्था करेल. 'किरकोळ समस्या आली तरी खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेऊ शकत नाही. बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेस व्यवस्थापनाशी तडजोड करण्यास तयार नाही. विशेषत: बॅक-टू-बॅक आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीतून बाहेर पडल्यानंतर. भारतीय क्रिकेट बोर्डाने कठोर भूमिका घेतली आहे.

हेही वाचा :WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने लगावला विजयी चौकार, आरसीबीचा सलग पाचवा पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details