महाराष्ट्र

maharashtra

क्रिकेटर मोहम्मद शमीचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 11:04 PM IST

Mohammed Shami received Arjuna Award : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आल. राष्ट्रपती भवनात हा त्याचा सन्मान सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

Mohammed Shami received Arjuna Award
क्रिकेटर मोहम्मद शमीचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान

क्रिकेटर मोहम्मद शमीचा राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली :Mohammed Shami received Arjuna Award : नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मोहम्मद शमी याने सर्वांनाच प्रभावित केलं होतं. दुखापत झालेली असतानाही मोहम्मद शमीने दमदार कामगिरी केली. दरम्यान,आज मंगळवार (९ जानेवारी)रोजी क्रिकेट विश्वात भारताचं नाव रोषण केल्यामुळं मोहम्मद शामीचा भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान झाला. यावेळी मोहम्मद शमी याच्यासह 26 जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन) आणि रँकीरेड्डी सात्विक साई राज (बॅडमिंटन) यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

एकून 7 सामने : भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये शमीने चमकदार कामगिरी केली. शमी पहिल्या 4 सामन्यांत खेळू शकला नाही. यानंतर संधी मिळताच त्याने कहर केला. शमी या स्पर्धेत एकून 7 सामने खेळला, ज्यात त्याने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. शमीने विश्वचषकात 5.26 च्या सरासरीने या विकेट घेतल्या. मात्र, भारतीय संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं.

पुरस्कार मिळाला यापेक्षा मोठा आनंद नाही : हा पुरस्कार मिळाल्यानंतर शमीने अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद असल्याचं म्हटलं. शमी म्हणाला की, हा पुरस्कार मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. हा पुरस्कार मिळावा हे प्रत्येकाचं स्वप्न असत. काहींच आयुष्य जात पण हा पुरस्कार भेटत नाही. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया शमीनं या पुरस्कार सन्मानावर दिलीय.

अर्जुन अवॉर्ड

  • तीरंदाजी - ओजस प्रवीण देवताले
  • तीरंदाजी - अदिति गोपीचंद स्वामी
  • एथलेटिक्स - श्रीशंकर
  • एथलेटिक्स - पारुल चौधरी
  • बॉक्सिंग - मोहम्मद हुसामुद्दीन
  • शतरंज - आर वैशाली
  • क्रिकेट - मोहम्मद शमी
  • घुड़सवारी - अनुश अग्रवाल
  • घुड़सवारी ड्रेसेज - दिव्यकृति सिंह
  • गोल्फ - दीक्षा डागर
  • हॉकी - कृष्ण बहादुर पाठक
  • हॉकी - सुशीला चानु
  • कबड्डी - पवन कुमार
  • कबड्डी - रितु नेगी
  • खो-खो - नसरीन
  • लॉन बॉल्स - पिंकी
  • शूटिंग ऐश्वर्या - प्रताप सिंह तोमर
  • शूटिंग - ईशा सिंह
  • शूटिंग - हरिंदर पाल सिं
  • टेबल टेनिस - अयहिका मुखर्जी
  • रेसलिंग - सुनील कुमार
  • रेसलिंग - अंतिम
    वुशु - रोशीबिना देवी
  • पैरा आर्चरी - शीतल देवी
  • ब्लाइंड क्रिकेट - अजय कुमार
  • पैरा कैनोइंग - प्राची यादव

ABOUT THE AUTHOR

...view details