महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 Updates: मिचेल मार्शच्या आयपीएल सहभागाबद्दल महत्वाची माहिती; 'या' तारखेला दिल्ली कॅपिटल्स सोबत जोडला जाणार

By

Published : Mar 30, 2022, 7:18 PM IST

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून दुखापतीमुळे तो बाहेर पडला ( Mitchell marsh out of Pakistan series ) आहे. तो आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला जाणार आहे. त्या अगोदर त्याला आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर तो आपल्या दुखापतीतून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करेल.

Mitchell marsh
Mitchell marsh

कराची: पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan v Australia ) संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने 88 धावांनी जिंकला. त्याचबरोबर या सामन्यात हिप दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( All-rounder Mitchell Marsh ) सहभागी झाला नव्हता. तो आता या मालिकेतून बाहेर पडला आहे. मिचेल मार्श आपल्या दुखापतीमधून सावरलेला नाही. परंतु तो भारतात येऊन दिल्ली कॅपिटल्स सोबत आपल्या दुखापतीची रिकव्हरी करणार आहे. त्यासाठी तो जेव्हा ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानचा दौरा संपेल, तेव्हा तो आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासोबत ( Delhi Capitals Team ) 6 एप्रिलला जोडला जाईल.

दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात फक्त 7 परदेशी खेळाडू विकत घेतले होते. तसेच ते आपल्या पहिल्या सामन्यात फक्त दोन परदेशी खेळाडूंसोबत उतरले होते. ऑस्ट्रेलियन खेळाडू दौऱ्यानंतर येतील, तर मुस्तफिझूर आणि लुंगी एनगिडीचे ( Mustafizur and Lungi Engidi ) क्वारंटाइन पूर्ण झाले नाही. एनरिक नॉर्टजे देखील दुखापतीतून सावरलेला नाही आणि तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी आणि सध्या न्यू साउथ वेल्सचे फिजियोथेरेपिस्ट पॅट्रिक फरहार्ट ( Physiotherapist Patrick Farhart ) यांच्या देखरेखीखाली मिचेल मार्श आपल्या दुखापतीमधून सावरेल. त्यानंतर त्याला तीन दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दौऱ्यातील उर्वरित तीन सामन्यांमधून मार्शला वगळण्यात आले आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की, मार्श आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स सोबत सामिल होण्यासाठी भारत दौऱ्यावर जाईल. जेथे माजी ऑस्ट्रेलियन आणि सध्याचे न्यू साउथ वेल्स फिजिओथेरपिस्ट पॅट फरहार्ट क्वारंटाइन कालावधीनंतर त्यांच्या दुखआपतीतून सावरण्यासाठी व्यवस्था करतील.

दुखापतीमुळे पाकिस्तानच्या दौऱ्यातून बाहेर झाल्यामुले मिचेल मार्श नाराज झाला आहे. त्यानंतर मिचेल मार्शने बुधवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक निवेदन दिले आहे. ज्यामध्ये तो म्हणाला आहे की, ''प्रवास आणि आयसोलेशनच्या ब्रेक विना पूर्णपणे रिकव्हरीवर लक्ष केंद्रित करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यामुळे मी निराश झालो आहे. पण आमच्या पुढील दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात पुन्हा सामील होण्यास उत्सुक आहे.''

हेही वाचा -Women's World Cup: ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर 157 धावांनी विजय; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details