महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 RR vs LSG : नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; राजस्थानमध्ये दोन तर लखनौ संघात एक बदल

By

Published : May 15, 2022, 7:28 PM IST

आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( RR vs LSG ) आयपीएल 2022 मधील 63 वा सामना होणार आहे. तत्पुर्वी रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियवर साडेसातला सुरु होणार आहे.

RR vs LSG
RR vs LSG

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 63 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Rajasthan Royals vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियवर साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्यात नाणेफेक पार पडली. राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Rajasthan Royals opt to bat ) घेतला आहे.

लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super giants team ) आतापर्यंत 12 सामन्यात 8 विजयासह 16 गुण मिळवले आहे. त्याचबरोबर या संघाचा चार सामन्यात पराभव झाला आहे. तसेच हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals team ) 12 सामन्यात सात विजयासह 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत पाच सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला होता.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसीन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा आणि आवेश खान.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय.

हेही वाचा -IPL 2022 Updates : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉला रुग्णालयातून डिस्चार्ज

ABOUT THE AUTHOR

...view details