महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 LSG vs CSK: पराभवाचे वारे! लखनऊ सुपर जायंट्सचा चेन्नईवर 6 गडी राखून दणदणीत विजय

By

Published : Mar 31, 2022, 10:59 PM IST

Updated : Apr 1, 2022, 7:21 AM IST

आयपीएल 2022 सुरू झाले आहे, परंतु चेन्नई सुपर किंग्ज आणि त्यांच्या चाहत्यांसाठी हंगामाची सुरुवात चांगली झालेली नाही. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि रवींद्र जडेजाला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले. ( Chennai Super Kings ) जडेजाच्या नेतृत्वाखाली, CSK प्रथम कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभूत झाले. ( Batsman Robin Uthappa ) आणि आता गुरुवारी (दि. 31 मार्च)रोजी त्यांना लखनऊ सुपर जायंट्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. धोनीने कर्णधारपद सोडताच चेन्नई सुपर किंग्जचे पराभवाचे वारे सुरू झाले अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली, सीएसकेने हंगामातील पहिले दोन सामने गमावले आहेत.

LSG VS CSK
LSG VS CSK

मुंबई: लखनौविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. लखनौने हे लक्ष्य 19.3 षटकांत 4 गडी गमावून पूर्ण केले. रॉबिन उथप्पाच्या 50 आणि शिवम दुबेच्या 49 धावांच्या जोरावर संघाला ही धावसंख्या गाठण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने 3 चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला. यादरम्यान एविन लुईसने 23 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली.

चार्जर्सविरुद्ध 215 धावांचा यशस्वी पाठलाग - केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. जो 2020 मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध 224 धावा करून विजय मिळवला होता. यासह मुंबईने 2021 मध्ये दिल्लीविरुद्ध 219 धावांचे आणि राजस्थानने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध 215 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

हा सलग दुसरा पराभव आहे - अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी 9 धावांची गरज होती. चेन्नईसाठी मुकेश चौधरीने हे षटक केले. या षटकात मुकेशने दोन वाईड चेंडू टाकले. त्यानंतर आयुष बडोनीने षटकार ठोकला. षटकातील तिसऱ्या चेंडूवर एकल घेत लखनौने 6 गडी राखून विजय मिळवला. लखनौसाठी एविन लुईस 23 चेंडूत 55 धावा करून नाबाद राहिला, तर आयुष बडोनीने 9 चेंडूत 19 धावा केल्या. चेन्नईकडून ड्वेन प्रिटोरियसने दोन बळी घेतले. ड्वेन ब्राव्हो आणि तुषार देशपांडे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. चेन्नईचा या मोसमातील हा सलग दुसरा पराभव आहे.

ड्वेन प्रिटोरियसने राहुलला बाद केले - 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ संघाने धमाकेदार सुरुवात केली. कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 10.2 षटकांत 99 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी स्फोटक खेळी खेळल्या. राहुल २६ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याच्या बॅटने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 153.85 होता. ड्वेन प्रिटोरियसने राहुलला बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाची आयपीएलमधील ही पहिली विकेट आहे.

उथप्पाचा स्ट्राईक रेट 185.19 होता - चेन्नईच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर तिसर्‍याच षटकातच संघाला पहिला धक्का बसला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड एक धाव काढून धावबाद झाला. त्याने रॉबिन उथप्पासोबत पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर मोईन अली क्रीझवर आला. यानंतर उथप्पा आणि मोईनने मिळून झटपट धावा केल्या. दोघांनी चेन्नईला 7.3 षटकांत 84 धावांपर्यंत मजल मारली. येथे उथप्पाच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. 27 चेंडूत 50 धावा करून तो बाद झाला. यादरम्यान त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. उथप्पाचा स्ट्राईक रेट 185.19 होता. त्याने आयपीएल कारकिर्दीतील 26 वे अर्धशतक झळकावले. त्याला रवी बिश्नोईने एलबीडब्ल्यू केले.

मोईनने 22 चेंडूंत चार चौकार - शिवम दुबेने अंबातीसोबत अर्धशतकी भागीदारी केली. दोन विकेट पडल्यानंतर मोईन आणि शिवम दुबे यांनी संघाला 100 धावांच्या पुढे नेले. 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोईन बाद झाला. त्याला आवेश खानने क्लीन बोल्ड केले. मोईनने 22 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 159.09 होता. शिवम दुबेने अंबाती रायडूसोबत चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. रायुडूने 20 चेंडूत 27 धावा केल्या. त्याच्या बॅटने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 135 होता. शिवम दुबेचे अर्धशतक हुकले. 30 चेंडूत 49 धावा करून तो 19व्या षटकात बाद झाला. दुबेने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 163.33 होता.

ड्वेन प्रिटोरियसला खातेही उघडता आले नाही - धोनीने येताच षटकार ठोकला महेंद्रसिंग धोनी 19व्या षटकात क्रीझवर आला. येताच त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. धोनीने शेवटच्या 10 पैकी सहा चेंडूंचा सामना केला. यादरम्यान 16 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. धोनीचा स्ट्राईक रेट 266.67 होता. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन धक्के बसले. रवींद्र जडेजा नऊ चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात ड्वेन प्रिटोरियसला खातेही उघडता आले नाही.

हेही वाचा -Imran Khan : अडचणीत आलेल्या इम्रान खानने पुन्हा काढला काश्मीरचा मुद्दा.. म्हणाले, 'मै झुकेगा नहीं'

Last Updated : Apr 1, 2022, 7:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details