महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 GT vs CSK : नाणेफेक जिंकून सीएसकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाची अशी आहे प्लेइंग इलेव्हन

By

Published : May 15, 2022, 3:19 PM IST

आयपीएल 2022 मधील 62 वा सामना रविवारी दुपारी साडेतीनला सुरु होत आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याचे टायटन्स धोनीच्या सुपर किंग्ज सोबत लढतील.चेन्नई संघाने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

GT vs CSK
GT vs CSK

मुंबई: रविवारी (15 मे) आयपीएल 2022 डबल हेडर सामने होणार आहेत, यातील पहिला म्हणजेच 62 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स ( Chennai Super Kings vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर दुपारी साडेतीन पासून सुरु होईल. गुजरात टायटन्सने प्ले-ऑफमध्ये अगोदर स्थान मिळवले आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्ले-ऑफमच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवून अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याची नाणेफेक हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिग धोनी यांच्यात पार पडली आहे. चेन्नई संघाने नाणेफे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्स 12 पैकी 9 सामने जिंकून प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे आणि गुणतालिकेत अव्वल आहे. या सामन्याच्या निकालाने फारसा फरक पडणार नाही, तरीही सीएसके अंतिम सामन्यांमध्ये शानदार खेळ दाखवून स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरातला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि मोहम्मद शमी.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, मोईन अली, एन जगदीसन, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार), प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, मथीशा पाथिराना आणि मुकेश चौधरी.

हेही वाचा -KKR vs SRH: कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायझर्स हैदराबादवर ५४ धावांनी एकतर्फी विजय

ABOUT THE AUTHOR

...view details