महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

By

Published : Apr 22, 2022, 7:15 PM IST

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत, दिल्ली कॅपिटल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

RR vs DC
RR vs DC

मुंबई: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Rajasthan Royals vs Delhi Capitals ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 34 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अगोदर पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार होता. परंतु दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने हा सामना मुंबईला हलवण्यात आला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातला सुरु होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ( Delhi Capitals opt to bowl ) करण्याचा निर्णय घेत, राजस्थान रॉयल्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) आतापर्यंत या हंगामात सहा सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघाचे आठ गुण असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals Team ) देखील सहा सामने खेळले असून तीन विजय आणि तीन पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे या संघाच्या खात्यात सहा गुण आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तसेच दोन्ही संघानी देखील आपल्या मागील सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. ज्यामध्ये दिल्लीने पंजाबचा तर राजस्थानने कोलकात्याचा पराभव करत विजय संपादन केले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील हेड टू हेड -

1. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 24 सामने झाले आहेत, त्यापैकी डीसीने 12 आणि आरआरने 12 वेळा विजय मिळवला आहे.

2. दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधार ऋषभ पंतने ( Rishabh Pant ) राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 300 धावा केल्या आहेत.

3. दिल्लीविरुद्ध राजस्थानच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार संजू सॅमसनने ( Sanju Samson ) सर्वाधिक 234 धावा केल्या आहेत.

4. दिल्ली कॅपिटल्सच्या कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) राजस्थान रॉयल्सविरुद्ध सात विकेट घेतल्या आहेत.

5. राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील असलेला ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने ( Off-spinner Ravichandran Ashwin ) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 विकेट घेतल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, करुण नायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅककॉय आणि युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन):पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद.

हेही वाचा -Ipl 2022 Updates : चहल एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडू शकतो ग्रॅम स्मिथ

ABOUT THE AUTHOR

...view details