महाराष्ट्र

maharashtra

WI vs IND 2nd T20: दुसऱ्या टी 20 मध्येही भारताच्या पदरी निराशा, काय आहेत भारतीय संघाच्या पराभवाची कारणे

By

Published : Aug 7, 2023, 11:10 AM IST

भारतीय संघाचा दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाला. या पराभवासह भारतीय संघ पाच टी20 च्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. दरम्यान सामन्यात हार्दिक धोका न पत्कारल्याने भारताचा पराभव झाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय फलंदाजी चांगली झाली नसल्याने टीम इंडिया पराभूत झाल्याचे कारण कर्णधार हार्दिक पांड्याने दिले आहे.

भारतीय संघाचा दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव
भारतीय संघाचा दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव

गुयाना: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यातही भारतीय फलंदाजी कुचकामी ठरली. या पराभवासह टीम इंडिया पाच टी20 सामन्याच्या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. संघात यंग बिग्रेड असताना ही भारतीय संघाचा पराभव का झाला? याची कारणे आपण जाणून घेऊ..

दुसरा पराभव: गुयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडिजच्या संघात दुसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी घेऊन वेस्ट इंडिजपुढे मोठे आव्हान देण्याचा पांड्याचा प्लान फसला. कारण भारतीय सलामीवीर फलंदाजीची जोडी यावेळीही अपयशी ठरली. भारताने दिलेले 153 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 19 षटकात पार केले.

8 गडी गमावूनही जिंकला सामना: टीम इंडियाची सलामीवीर जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली. भारतीय फलंदाज तिलक वर्माच्या 51 आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या 24 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 152 धावांचा टप्पा पार केला. 153 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाने 129 धावांवर 8 गमावले. हे पाहून भारतीय संघ सामना सहज जिंकेल असेल असे प्रत्येकाला वाटत होते. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजला 24 चेंडूमध्ये 24 धावा आवश्यक होत्या आणि हातात शेवटचे दोन गडी बाकी होते. त्यावेळी 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला जोसेफने अकील हुसैनच्या मदतीने 26 धावांची पार्टनरशीप केली. या दोघांनी 17 चेंडूंमध्येच 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

पांड्याचे निर्णय चुकले: कर्णधार हार्दिक पांड्याचे या सामन्यात 2 निर्णय चुकले. हे निर्णयही टीम इंडियाच्या पराभवाचा कारण बनले. या सामन्यात टीम इंडिया 6 गोलंदाजांसह मैदानात उतरली होती. परंतु कर्णधाराने फक्त 5 गोलंदाजांचा उपयोग केला. वेस्ट इंडिजविरुद्ध अक्षर पटेलला गोलंदाजीची संधी मिळालीच नाही. वेस्ट इंडिजने चौथ्या ओव्हरमध्ये 32 धावात 3 विकेट गमावले होते.

चहलला नाही दिली गोलंदाजी: 16 व्या षटकात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचे 3 गडी बाद केले होते. यातील 2 विकेट लेग स्पिनर युजवेंद्र चहलने घेतले होते. जेसन होल्डर आणि शिमरॉन हेटमायर या दोघांना चहलने बाद केले. चहल चांगली गोलंदाजी करत होता. तरीही हार्दिकने त्याला त्याचे चौथे षटक टाकून दिले नाही. चहलने आपल्या 3 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले होते.

हार्दिकने काय सांगितली पराभवाची कारणे: सामन्यातील पराभवासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजांना दोषी ठरवले. भारताच्या या पराभवासाठी जबाबदार कोण असा प्रश्न हार्दिक पांड्याला विचारला गेला. तेव्हा त्याने फलंदाजी चांगली झाली नसल्याचे म्हटले.

आमचे खेळाडू बाद होत राहिले आणि खेळपट्टी संथ होती. आम्ही 160 हून अधिक धावांपर्यंत पोहोचू शकलो असतो. ज्या पद्धतीने पूरन फलंदाजी केली ते पाहता फिरकी गोलंदाजांना योग्य पद्धतीने वापरणे कठीण होते. तुम्ही अशावेळी गोलंदाजी करताना चेंडू पूरनपासून दूर टाकला की जवळ याचा त्याला विशेष काही फरक पडत नाही. 2 धावांवर 2 गडी तंबूत परतल्यानंतरही त्यांनी जशी फलंदाजी केली ती खरोखरच अविश्वसनीय आहे.

तळाची फलंदाजी दुरुस्तीची गरज: पराभवाची कारणे सांगताना हार्दिक पांड्या म्हणाला की,आमच्याकडे सध्या जे कॉम्बिनेशन उपलब्ध आहे. त्यानुसार 7 फलंदाजांना घेऊन खेळावं लागते. गोलंदाजही सामने जिंकवतात. यामुळे आम्हाला आता 8,9 आणि 10 व्या क्रमांकावरील फलंदाजी अधिक सक्षम करावी लागेल. त्या क्रमांकवरील फलंदाजी कशी सक्षम होईल याकडे लक्ष द्यावे लागेल.

हेही वाचा-

  1. India Vs Pakistan : मोठी बातमी! विश्वचषकात रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, सरकारकडून ग्रीन सिग्नल
  2. Sachin Tendulkar : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा एकदा रंगणार सचिन विरुद्ध अख्तर सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे

ABOUT THE AUTHOR

...view details