महाराष्ट्र

maharashtra

IND vs AUS : केएल राहुलला धक्का! खुद्द उपकर्णधाराला साईडला करत रवी शास्त्रींची शुभमन गिलला पसंती

By

Published : Feb 9, 2023, 7:56 AM IST

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यासाठी रवी शास्त्री यांनी आपल्या इलेव्हनची निवड केली आहे.पाचव्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या जवळ कोणीही येत नाही त्यामुळे शुभमन गीलला या मालिकेत स्थान मिळाले पाहिजे. असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मांडले आहे. त्याशिवाय उपकर्णधार केएल राहुलच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक प्रकारे संघाबाहेरचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

KL Rahul Shubman Gill
केएल राहुल शुभमन गील

नागपूर :भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आजपासून नागपुरात सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील खेळाडूंच्या निवडीवर भाष्य केले आहे. उपकर्णधार केएल राहुलच्या खेळीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याला स्थान न द्यावे असे सांगितले आहे. त्याशिवाय फॉर्मात असलेला फलंदाज शुभमन गिलचा विचार करावा असे त्यांनी म्हटले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंवा स्थान द्यावे याची यादी त्यांनी जाहीर केली आहे.

शुभमन गिल फॉर्मात :जर शुभमन गिल फॉर्मात आहे. उपकर्णधार केएल राहुल पेक्षा चांगला खेळत आहे. तर केएल राहुलची जागा त्याला घ्यावी असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. शास्त्री असेही म्हणाले आहेत की, पाचव्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादवच्या जवळ कोणीही येत नाही त्यामुळे मधल्या फळीतील T20 फलंदाज शुभमन गीलला या मालिकेत त्याचे पसंतीचे स्थान मिळाले पाहिजे. "शुभमन किंवा राहुल यांच्या निवडीची जबाबदारी ही संघ व्यवस्थापनावर अवलंबून असते. सहाजिकच, तुमच्या आदीच्या खेळीवर ते अवलंबून असते, असे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले आहेत.

कुलदीप यादवकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा : ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या अनुकूल खेळपट्ट्या व्हाव्यात म्हणून बरीच अपेक्षा आहे. पण घरच्या मैदानावर भारतीय संघाने त्यांना 4-0 पराभूत करायला हवे. टॉस गमावल्यानंतरही पहिल्या सत्रापासूनच चेंडूने वळण घ्यायला हवे. यात मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला त्याचे काम चोख बजावावे लागेल. असे मला वाटते असे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. जेव्हा फिंगर स्पिनरला मदत मिळत नाही असे वाटेल त्यावेळी लेग स्पिनरने मोर्चे बांधणी करून जादूई प्रदर्शन करावे, असे शास्त्री म्हणाले.

४-० ने विजयासाठी प्रयत्न : यजमान असल्याने भारताने ४-० ने विजयासाठी प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले. भारताने 4-0 ने जिंकण्यासाठी पाहिले पाहिजे, आपण घरच्या मैदानावर खेळत आहोत. मी ऑस्ट्रेलियाच्या दोन दौऱ्यांवर गेलो आहे, मला माहित आहे काय झाले. सूर्यकुमार फॉर्ममध्ये असताना टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या संघातील उपस्थितीमुळे नागपूर कसोटीपूर्वी आणखीनच तणाव वाढला आहे. तर श्रेयस अय्यर नसल्याने पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमारला स्थान मिळेल असे शास्त्री म्हणाले आहेत. शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल का? हा एक प्रश्न आहे. त्या जागेसाठी योग्य व्यक्तीची गरज आहे. पाचव्या स्थानासाठी जेव्हा तुम्ही तिथे जाता, विशेषत: जर चेंडू वळत असेल, तेव्हा तुम्हाला स्पिनवर योग्य शॉट्स खेळण्याची गरज असते. त्यासाठी सक्षम असलेल्या व्यक्तीची आवश्यकता असते. सूर्यकुमार त्या पदाची मागणी करतो. मला वाटते ते योग्य आहे.

हेही वाचा :Border Gavaskar Trophy : नागपूरच्या जामठा मैदानावर भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामना रंगणार

ABOUT THE AUTHOR

...view details