महाराष्ट्र

maharashtra

U19 आशिया कप स्पर्धा; पाकिस्तान विजयी, भारताचा दारूण पराभव

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 2:58 PM IST

Updated : Dec 10, 2023, 7:39 PM IST

Ind Vs Pak U19 : १९ वर्षाखालील आशिया कप २०२३ च्या ५ व्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान होतं. या सामन्यात पाकिस्ताननं टीम इंडियाचा ८ गडी राखून दारूण पराभव केला.

IND U19 vs PAK U19 Score update 2023
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19

हैदराबाद Ind Vs Pak U19 :भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-१९ आशिया चषक २०२३ मधील ५ वा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं भारताचा ८ गडी राखून पराभव केला आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २५९ धावा केल्या. पाकिस्ताननं हे लक्ष्य ४७ षटकात केवळ २ गडी गमावून गाठलं.

अझान अवेसनं शानदार शतक : पाकिस्तानकडून अझान अवेसनं शानदार शतक ठोकलं. तो १३० चेंडूत १०५ धावा करून नाबाद राहिला. त्याला शाहजेब खान आणि कर्णधार साद बेग यांनी उत्तम साथ दिली. या दोघांनी अनुक्रमे ६३ आणि नाबाद ६८ धावा केल्या. सलामीवीर शमिल हुसेन ८ धावा करून बाद झाला. भारताकडून मुरुगन अभिषेकनं दोन्ही बळी घेतले.

भारताची दमदार सुरुवात : भारताच्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या आदर्श सिंग आणि अर्शीन कुलकर्णी यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. भारताला पहिला धक्का अर्शीन कुलकर्णीच्या रूपानं बसला, त्याला आमीर हसननं २४ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या १० षटकांत भारतानं १ गडी गमावून ४२ धावा केल्या होत्या. स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रुद्र पटेलच्या (१) रूपानं टीम इंडियाला दुसरा धक्का बसला.

मोहम्मद जीशानचे ४ बळी : टीम इंडियानं २५ व्या षटकात १०० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार सहारन आणि आदर्श यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी झाली. शानदार फलंदाजी करणारा आदर्श सिंग ६२ च्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. टीम इंडियाला १३९ धावांवर तिसरा धक्का बसला. त्यांच्यानंतर फलंदाजीला आलेला मुशीर २ आणि अवनीश ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार उदय सिरहाननं ८९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद जीशाननं ४६ धावा देत ४ गडी बाद केले.

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

भारत : आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, रुद्र पटेल, उदय सहारन (कर्णधार), मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

पाकिस्तान :शमिल हुसेन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार/यष्टिरक्षक), मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन, उबेद शाह.

हेही वाचा :

  1. रोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिका ४-१ ने जिंकली
  2. आयपीएल २०२४ च्या लिलावात 'या' ५ खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
  3. २३ वर्षीय रवी बिश्नोईचा भीम पराक्रम! राशिद खानला मागे टाकून बनला जगातील नंबर १ गोलंदाज
Last Updated :Dec 10, 2023, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details