महाराष्ट्र

maharashtra

Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा नेदरलॅंडवर शानदार विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 9:10 PM IST

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं नेदरलॅंडवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह अफगाण संघानं उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. २८ धावा देत ३ बळी घेणाऱ्या मोहम्मद नबीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

लखनऊ Cricket World Cup 2023 :क्रिकेट विश्वचषकाचा ३४ वा सामना आज नेदरलॅंड आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्ताननं नेदरलॅंडवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला.

मोहम्मद नबीचे ३ बळी : नेदरलॅंडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलॅंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वेस्ली बॅरेसी केवळ १ धाव करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या कॉलिन अकरमननं मॅक्स ओडोडसह डावाला आकार दिला. ओडोड ४२ तर अकरमन २९ धावा करून परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सायब्रँड एंजेलब्रेक्टनं ५८ धावांचं योगदान दिलं. मात्र यानंतर नेदरलॅंडची फलंदाजी ढेपाळली. त्यांचा पूर्ण संघ ४६.३ षटकांत १७९ धावांवर ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीनं २८ धावा देत ३ बळी घेतले.

अफगाणिस्ताननं सहज लक्ष्य गाठलं : नेदरलॅंडनं दिलेल्या १८० धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. रहमत शाहनं ५४ चेंडूत ५२, तर कर्णधार हशमतुल्ला शाहिदीनं ६४ चेंडूत ५६ धावांचं योगदान दिलं. अजमतुल्ला ३१ धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्ताननं हे लक्ष्य ३१.३ षटकांत केवळ ३ गडी गमावून गाठलं. नेदरलॅंडकडून व्हॅन बीक, व्हॅन डर मर्वे आणि साकिब झुल्फिकारनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, राशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, नूर अहमद

नेदरलँड्स : वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), बास डी लीड, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

हेही वाचा :

  1. Nepal Cricket Team : नेपाळ क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, टी २० विश्वचषकासाठी पात्र
  2. Fielding Medal : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर 'या' खेळाडूला मिळालं सर्वोत्कृष्ट फिल्डिंग मेडल, सचिननंही केलं कौतुक
  3. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ; जाणून घ्या भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details