महाराष्ट्र

maharashtra

ICC World Cup 2023 : दोन वेळेचा विश्वविजेता संघ, प्रथमच विश्वचषकातून बाहेर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 11:08 PM IST

ICC World Cup 2023 : दोन वेळच्या विश्वविजेत्या संघाने दोन दशके क्रिकेट जगतावर राज्य केले, मात्र प्रथमच या संघाला विश्वचषकातून बाहेर पडावं लागलंय.

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023

हैदराबादICC World Cup 2023 :क्रिकेट विश्वचषक 2023 कोण जिंकणार? असे अनेक प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना पडले आहे. म्हणून कोणी टीम इंडिया, तर कोणी इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला पुढचा विश्वविजेता असेल असं म्हणत आहे. पण हाच प्रश्न 4, 5 दशकांपूर्वी विचारला असता, तर नवशिक्या क्रिकेट पंडितांनीही या विश्वचषकाचा भाग नसलेल्या संघावर सट्टा लावला असता. ही गोष्ट आहे दोन वेळचा विश्वविजेता, दोन वेळा T20 चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजची. ज्यांना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्रता मिळवता आली नाही. एकदिवसीय क्रिकेटमधील 5 दशकांतील या संघाचा हा सर्वात वाईट क्षण आहे.

क्रिकेट आणि वेस्ट इंडिज : क्रिकेटच्या मैदानावरील पहिली कसोटी १८७७ मध्ये खेळली गेली. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. वनडे असो वा कसोटी, पहिला सामना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. पण क्रिकेट हे केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही रोमांचक खेळ आहे, हे वेस्ट इंडिज संघानं जगाला सांगितलं. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मर्यादित षटकांचं सामने खेळवले जात होते, तेव्हा या संघानं जगातील प्रत्येक संघाला गुडघे टेकवायला लावले होते. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये वसलेली छोटी बेटं मिळून वेस्ट इंडीज नावाचा देश आहे. या बेटांनी क्रिकेटसाठी चांगले खेळाडू, एक विश्वविजेता संघ दिला. जोपर्यंत क्रिकेट अस्तित्वात आहे तोपर्यंत वेस्ट इंडिजला जग लक्षात ठेवेल यात शंका नाही.

शिखरापासून सिफरपर्यंत : 70 आणि 80 च्या दशकात अर्धा डझनहून अधिक देश क्रिकेटच्या मैदानात उतरले होते. मात्र, त्या काळात वेस्ट इंडिजच्या संघानं जे काही साध्य केले त्याच्या जवळपासही आज कोणताही संघ नाही. 1975 मध्ये, जेव्हा प्रथमच एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक सुरू झाला, तेव्हा त्यामध्ये 8 संघांनी भाग घेतला होता. पण एकही संघ वेस्ट इंडिजसमोर टिकू शकला नाही. तेव्हा वेस्ट इंडिजनं त्यांचे पाचही सामने जिंकले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करून पहिला विश्वचषक जिंकला. अंतिम 1979 मध्ये इंग्लंडनं अंतिम फेरी गाठली. मात्र, जिथं क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली, वेस्ट इंडिजनं जवळजवळ एकतर्फी सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.

वेस्ट इंडिजनं स्वतःची वेगळी ओळख :70 च्या दशकात एकदिवसीय क्रिकेटच्या सुरुवातीसह, वेस्ट इंडिजनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ज्यासमोर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ देखील स्पर्धा करताना दिसले. 80 च्या दशकातील पहिला विश्वचषक 1983 मध्ये खेळला गेला होता. पहिल्या दोन विश्वचषकांप्रमाणंच इंग्लंड यजमान संघ होता. मात्र, यावेळी भारताच्या रूपानं जगाला नवा चॅम्पियन मिळाला. किंबहुना त्यावेळी वेस्ट इंडिजची स्थिती अशी, होती की भारताचा विजय अगदी शिल्ल्क मानला जात होता. याचं कारण 70 आणि 80 च्या दशकात अपराजित मानला जाणारा वेस्ट इंडिज संघ होता. 1975 आणि 1979 च्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजचा संघ एकही सामना हरला नाही. 1983 मध्ये फक्त भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. या विश्वचषकानंतरही संघाचा दबदबा कायम राहिला असला, तरी संघाला ते स्थान कधीच गाठता आले नाही. जसजसं 90 चं दशक जवळ येत गेलं, तसतसं संघाचे ते मोठे खेळाडू निवृत्त होत गेले. दोन वेळा विश्वविजेता संघ 1983 च्या विश्वचषकानंतर कधीच अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. 1996 ची उपांत्य फेरी वगळता हा संघ कधीच विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट चार संघांचा भाग बनला नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषक स्पर्धेतही नाही. वेस्ट इंडिज संघानं 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2004 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज : आजच्या युगात वेगवान गोलंदाजीचा विचार केला तर ब्रेट ली, शोएब अख्तर, शॉन टेट, शेन बाँड, डेल स्टेन या गोलंदाजांची नावं चाहत्यांच्या मनात येतात. ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं चेंडू टाकणारे हे गोलंदाज वेगवेगळ्या संघांचे भाग होते. पण विचार करा, एका संघात असे 4 गोलंदाज असतील तर विरोधी फलंदाजांचं काय होत असेल? मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, अँडी रॉबर्ट्स जोएल गार्नर आजच्या पिढीला ही नावं माहीत नाहीत. या चौघानं 70 आणि 80 च्या दशकात वेस्ट इंडिजला एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं. हे गोलंदाज त्या काळातील फलंदाजांसाठी दहशतीचं दुसरं नाव होतं. हा क्रिकेटचा काळ होता, जेव्हा फक्त फलंदाजालाच गोलंदाजाचा वेग जाणवत असे. आजच्या विपरीत, चेंडूचा वेग मोजण्यासाठी फलंदाजांसाठी ना स्पीडोमीटर, ना हेल्मेट किंवा इतर उपकरणं नव्हती, तसंच गोलंदाजांना बाउंसर टाकण्यावर कोणतेही बंधन नव्हते. वेस्ट इंडिजचे गोलंदाज फलंदाजांच्या हनुवटीपासून कोपरा, बोट, ते बरगड्यापर्यंतच्या प्रत्येक भागाची चाचणी घेत असत. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांच्या वेगवान चेंडूंनी जगभरातील फलंदाजांना अशा जखमा दिल्या आहेत, ज्या कायम त्यांच्या लक्षात राहतील. या गोलंदाजांसमोर फलंदाजांना दुखापत होणे, हे सामान्य होतं. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची भीती अजूनही अनेक फलंदाजांच्या आत्मचरित्रांचा भाग आहे. या चौघांची परंपरा नंतर कोर्टनी वॉल्श आणि कोर्टनी ॲम्ब्रोस सारख्या गोलंदाजांनी पुढं नेली. पण 90 च्या दशकाच्या अखेरीस हा संघ गोलंदाजीच्या आघाडीवर मागे पडू लागला.

वेस्ट इंडिजची फलंदाजी : आज जर तुम्ही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची नावे विचारली तर ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांच्यानंतर बरेच चाहते त्यांचा विचार करतील. पण एक काळ असा होता, की वेस्ट इंडिजचे फलंदाज कोणत्याही गोलंदाजाचा आक्रमणा चेंडूसोबत फेकत असत. डेसमंड हेन्स, गॉर्डन ग्रीनिज, व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉईड, गॅरी सोबर्स, रोहन कन्हाई, एल्विन कल्लीचरण यांसारख्या फलंदाजांनी या संघाला जवळपास दोन दशके विजयावर कायम ठेवलं. आजही कोणत्याही खेळाडूनं ऑल टाईम सर्वोत्कृष्ट संघ निवडला तर त्यात व्हिव्हियन रिचर्ड्सचं नाव नक्कीच येईल, गॅरी सोबर्सला आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हटलं जातं. ICC कडून दरवर्षी सर्वोत्कृष्ट खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाते.

खेळाडू उदयास आले पण संघ नाही : वेस्ट इंडिजची फलंदाजी नंतर काही प्रमाणात ब्रायन लारा, रामनरेश सरवन, शिव नारायण चंद्रपॉल, ख्रिस गेल यांसारख्या फलंदाजांनी हाताळली. त्याचप्रमाणे गोलंदाजीतही काही नावे उदयास आली. पण 90 च्या दशकापासून संघाची कामगिरी घसरत राहिली. नव्या शतकाच्या आगमनाने वेस्ट इंडिज संघाचा सूर्य इतिहासाच्या पानात मावळत होता. संघाची काही नावे जगभर चमकली पण एक संघ म्हणून वेस्ट इंडिजला पुन्हा ती जादू दाखवता आली नाही.

इतिहासाची सोनेरी पाने आणि आजचे सत्य : नव्या शतकात या संघानं दोन टी-20 विश्वचषक, एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असली, तरी आज संघाची अवस्था बिकट आहे. विश्वचषकातील अव्वल 10 संघांमध्ये सामील होण्यासाठी वेस्ट इंडिजला नेदरलँड, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड स्टेट्स, झिम्बाब्वे, स्कॉटलंड, ओमान यांसारख्या संघांसोबत क्वालिफायर सामने खेळावे लागले. जिथे जून-जुलै 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यांमध्येही संघ झिम्बाब्वे, स्कॉटलंडसारख्या संघांकडून पराभूत झाला. या क्वालिफायरद्वारे 2023 च्या विश्वचषकात प्रवेश करणाऱ्या नेदरलँड्सनं वेस्ट इंडिजचाही पराभव केला. वेस्ट इंडिजनं 50 षटकांत 374 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, पण नेदरलँड्सनंही स्कोअर बरोबरीत ठेवत सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या क्वालिफायर सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाच्या सर्वात वाईट अवस्थेची झलक पाहायला मिळाली.आज ICC क्रमवारीत वेस्ट इंडिज टी-20 मध्ये 7व्या, कसोटीत 8व्या आणि वनडेमध्ये 10व्या स्थानावर आहे.

हेही वाचा -

  1. Cricket World Cup 2023 : भारतीय संघात विश्वकप जिंकण्याची क्षमता - चंचल भट्टाचार्य
  2. ICC World Cup 2023 : विश्वचषकासाठी काय आहे भारतीय संघाची ताकद, कमजोरी?
  3. 2023 Cricket World Cup : अक्षर पटेलसाठी क्रिकेट विश्वचषकतील सुवर्ण संधी यावेळीही हुकली, भावाची भावनिक प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details