महाराष्ट्र

maharashtra

IND vs ENG 2nd ODI : धोनी, तेंडुलकर, गांगुली, हरभजन, रैना लॉर्ड्सवर सामना पाहण्यासाठी होते हजर

By

Published : Jul 15, 2022, 5:25 PM IST

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला ( IND vs ENG 2nd ODI ) गेला. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि इतर माजी खेळाडू देखील पोहोचले होते. दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतावर 100 धावांनी मात केली.

IND vs ENG
IND vs ENG

लंडन: इंग्लंड आणि भारत ( Eng vs Ind ) यांच्यात गुरुवारी लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमधील काही माजी क्रिकेटपटूंसह अनेक माजी भारतीय दिग्गजही सामना पाहण्यासाठी आले होते. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Former all-rounder Suresh Raina ) आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी, फिरकीपटू हरभजन सिंगही मॅच एन्जॉय करण्यासाठी आले ( Former cricketer present to watch match ) होते. रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, मुलांना निळ्या रंगात पाहून आनंद झाला. धोनी एजबॅस्टन आणि ट्रेंट ब्रिजच्या स्टँडवरून भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा आणि तिसरा टी-20 सामना पाहण्यासाठी आला होता.

याशिवाय भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही ( BCCI President Sourav Ganguly ) तिथे दिसला, जो महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत ( Great cricketer Sachin Tendulkar ) स्टँडमध्ये बसला होता आणि पहिल्या डावात एका विषयावर हसत होता. गांगुली आणि तेंडुलकर सामना पाहतानाचे फोटो पोस्ट करत बीसीसीआयने लिहिले की, "ग्रेट कपल परत आले आहे." टीव्ही दृश्यांमध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड ( Former captain Clive Lloyd ) तसेच लॉर्ड्सवरील माजी इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रायन साइडबॉटम देखील दाखवण्यात आले होते.

भारत आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना लॉर्डस स्टेडियमवर गुरुवारी पार ( IND vs ENG 2nd ODI ) पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 100 धावांनी पराभव ( England beat india by 100 runs ) केला. या सामन्यात इंग्लंडने भारताला 247 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु भारतीय संघ 38.5 षटकांत 146 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा -Lalit Modi Life : सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या मोदीने, विजय मल्ल्याच्या मुलीला ठेवले होते पर्सनल असिस्टंट

ABOUT THE AUTHOR

...view details