महाराष्ट्र

maharashtra

India vs West Indies : धोनी-गावस्करला धवनने टाकले मागे, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली ऐतिहासिक खेळी

By

Published : Jul 23, 2022, 4:34 PM IST

भारताकडून कर्णधार शिखर धवनने ( Captain Shikhar Dhawan ) 97 धावांची खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा धवन आता सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. वयाच्या 36 वर्षे 229 दिवसांत धवनने हा पराक्रम केला.

Shikhar Dhawan
शिखर धवन

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजयाची नोंद करत 1-0 अशी आघाडी ( India defeated West Indies ) घेतली आहे. टीम इंडियाने हा सामना तीन धावांनी जिंकला. कर्णधार शिखर धवनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यादरम्यान धवनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर ( Shikhar Dhawan new record ) केला, जो यापूर्वी दिग्गज कर्णधारांच्या नावावर होता.

त्याने या खेळीने महेंद्रसिंग धोनी ( Former captain Mahendra Singh Dhoni ), सुनील गावस्कर आणि मोहम्मद अझरुद्दीन सारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. धवनने 99 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 97 धावांची शानदार खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा धवन आता सर्वात वयस्कर कर्णधार बनला आहे. वयाच्या 36 वर्षे 229 दिवसांत धवनने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर होता, ज्याने 1999 मध्ये वयाच्या 36 वर्षे 120 दिवसांत अर्धशतक झळकावले होते. सुनील गावसकर यांनी वयाच्या 35 वर्षे 225 दिवसांत केले होते. त्याचवेळी कर्णधार एमएस धोनीने वयाच्या 35 वर्षे 108 दिवसात कर्णधार म्हणून अर्धशतक झळकावले होते.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 308 धावा केल्या होत्या. भारतासाठी आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने 97 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने ( Batsman Shubman Gill ) धवनला साथ देत 64 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तर श्रेयस अय्यरने 54 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाला 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजने पाचव्या षटकातच स्टार सलामीवीर होपची विकेट गमावली. होपने अवघ्या 7 धावा केल्या, पण त्यानंतर ब्रूक्ससह मियर्सने आघाडी घेतली. ब्रूक्स आणि मिअर्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी झाली.

हेही वाचा -India West Indies Series : पहिल्या सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय

ABOUT THE AUTHOR

...view details