लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यात 3-0 असा क्लीन स्वीप केले. मात्र, या मालिकेतील अंतिम सामना मोठ्या वादात सापडला. भारताची फिरकीपटू दीप्ती शर्मा 'मंकाडिंग'मुळे चर्चेत ( Deepti Sharma Mankading controversy ) आली. तिने सामन्याच्या शेवटी इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला नॉन स्ट्रायकरच्या चेंडूवर धावबाद ( Charlie Dean runs out on non striker ) केले. याची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांनी हे खेळ भावनेच्या विरोधात म्हंटले आहे, तर काहींनी नियमांनुसार असल्याचे म्हंटले आहे. मात्र, दीप्तीने आता या संपूर्ण वादावर मौन सोडले आहे.
अष्टपैलू दीप्ती शर्माने ( Deepti Sharma Break the Silence ) भारतात पोहोचल्यानंतर सांगितले की, नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर उभा असलेली डीन वारंवार क्रीज सोडत असल्याने हा योजनेचा एक भाग होता. “आम्ही तिला आधी चेतावणी दिल्याप्रमाणे हा आमच्या योजनेचा एक भाग होता, पण ती पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करत होती. आम्ही जे काही केले ते नियमानुसार होते. आम्ही पंचांनाही याबाबत सांगितले होते.