महाराष्ट्र

maharashtra

विश्वकरंडक गमावलेल्या विल्यमसनवर चाहते खूश...म्हणाले, 'खरा जेंटलमॅन'!

By

Published : Jul 15, 2019, 10:50 AM IST

केन विल्यमसनच्या शांत आणि संयमी स्वभावावर चाहते खूश झाले आहेत.

विश्वकरंडक गमावलेल्या विल्यमसनवर चाहते खूष...म्हणाले, 'खरा जेंटलमन'!

लॉर्ड्स - सुपरओव्हरच्या थरारनाट्यात रंगलेल्या विश्वकरंडक सामन्याच्या अंतिम फेरी इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवला. सामन्यात ८४ धावांची विजयी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीर तर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीर किताबाने गौरवण्यात आले. हा सामना आणि विश्वकरंडक न्यूझीलंडने गमावला असला तरी कर्णधार विल्यमसनवर चाहते भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी विल्यमसनला 'खरा जेंटलमॅन' असे म्हटले आहे.

केन विल्यमसनच्या शांत आणि संयमी स्वभावावर चाहते खूश झाले आहेत. सामना गमावल्यानंतरही विल्यमसनच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. त्याच्या हास्याचे फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिल्यानंतरही केन विल्यमसनने मैदानावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अंतिम सामन्यात गुप्टील बाद झाल्यानंतर विल्यमसनने संघाचा डाव सावरला होता. सा स्पर्धेत त्याने ५७८ धावा काढल्या आहेत. विश्वकरंडक स्पर्धेमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धेनेचा होता. जयवर्धनेने २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये रंगलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ५४८ धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड केन विल्यमसनने मोडित काढला आहे.

new zealand skipper gets love from social media after his loss against england in wc final

new zealand skipper, love, social media, loss against england, wc final, captain cool

विश्वकरंडक गमावलेल्या विल्यमसनवर चाहते खूष...म्हणाले, 'खरा जेंटलमन'!

लॉर्ड्स - सुपरओवरच्या थरारनाट्यात रंगलेल्या विश्वकरंडक सामन्याच्या अंतिम फेरी इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवला. सामन्यात ८४ धावांची विजयी खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सला सामनावीर तर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीर किताबाने गौरवण्यात आले. हा सामना आणि विश्वकरंडक न्यूझीलंडने गमावला असला तरी कर्णधार विल्यमसनवर चाहते भलतेच खूष झाले आहेत. त्यांनी विल्यमसनला 'खरा जेंटलमॅन' असे म्हटले आहे.

केन विल्यमसनच्या शांत आणि संयमी स्वभावावर चाहते खूष झाले आहेत. सामना गमावल्यानंतरही विल्यमसनच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. आणि या हास्याचे फोटो चाहते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिल्यानंतरही केन विल्यमसनने मैदानावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अंतिम सामन्यात गुप्टील बाद झाल्यानंतर विल्यमसनने संघाचा डाव सावरला होता. सा स्पर्धेत त्याने ५५७ धावा काढल्या आहेत. विश्वकरंडक स्पर्धेमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धेनेचा होता. जयवर्धनेने २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये रंगलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत ५४८ धावा केल्या होत्या. हा रेकॉर्ड केन विल्यमसनने मोडित काढला आहे.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details