महाराष्ट्र

maharashtra

सासऱ्याच्या ट्विटला जावयाचा रिप्लाय

By

Published : Mar 10, 2021, 7:11 PM IST

शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटला त्याचा होणारा जावई शाहिन शाह आफ्रिदीने, थँक्यू लाला... असे म्हणत रिप्लाय दिला आहे.

shaheen shah afridi reply to shahid afridis tweet
सासऱ्याच्या ट्विटला जावयाचा रिप्लाय

मुंबई - पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने, तिची मुलगी अक्सा हिचा साखरपुडा पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीसोबत होणार असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली होती. शाहिद आफ्रिदीच्या त्या ट्विटला त्याच्या होणाऱ्या जावईने, थँक्यू लाला... असे म्हणत रिप्लाय दिला आहे.

शाहिद आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये काय म्हटलं...

शाहिनच्या कुटुंबियांनी आमच्या कुटुंबाशी संपर्क साधला. दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या संपर्कात आहेत. नात्यांच्या गाठी अल्लाहच्या दारातच बांधल्या जातात. जर अल्लाहची इच्छा असेल तर हे नातेही जुळून येईल. मैदानावर आणि मैदानाबाहेरही शाहिनला खूब यश मिळो, हीच माझी प्रार्थना आहे, अशा आशयाचे ट्विट शाहीद आफ्रिदीने केले होते.

जावईने सासऱ्याच्या ट्विट काय दिला रिप्लाय

शाहिन शाह आफ्रिदीने सासरा शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्विटला छानसा रिप्लाय दिला आहे. जावई शाहिन म्हणतो, 'थँक्स लाला... तुम्ही माझ्यासाठी दिलेल्या आशिर्वादासाठी आणि प्रार्थनेसाठी... तुम्ही पूर्ण देशाचा गौरव आहात.'

दरम्यान, शाहिनचे हे ट्विट खूपच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सासरे-जावयाचे ट्विट लोकांना भावले आहे. नेटकरीही त्यांच्या या ट्विटवर व्यक्त होत आहेत.

हेही वाचा -टी-२० रॅकिंगमध्ये टीम इंडियाची उडी; ICC ने जारी केली ताजी क्रमवारी

हेही वाचा -IND VS ENG : हार्दिक म्हणतोय.. तयारी झाली आहे, मैदानावर जाण्यासाठी वाट पाहू शकत नाही

ABOUT THE AUTHOR

...view details