महाराष्ट्र

maharashtra

CSK vs DC : दिल्लीचा चेन्नईवर ४४ धावांनी विजय; धोनीच्या संघाचा मोसमातील सलग दुसरा पराभव

By

Published : Sep 25, 2020, 7:05 PM IST

Updated : Sep 26, 2020, 12:28 AM IST

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ४४ धावांनी विजय मिळवला.

ipl 2020 csk vs dc live match
CSKvsDC LIVE

दुबई -दिल्ली कॅपिटल्सने महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव केला. याबरोबरच चेन्नईचा हा मोसमातील सलग दुसरा पराभव ठरला. चेन्नईला विजयासाठी दिल्लीने १७६ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, चेन्नईला ७ बाद १३१ पर्यंतच मजल मारता आली. ४३ चेंडूत ६४ धावा करणाऱ्या दिल्लीच्या पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

चेन्नईकडून फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने ३५ चेंडूत चार चौकरांसह सर्वाधिक ४३ धावा केल्या. यानंतर केदार जाधवने २१ चेंडूत तीन चौकांसह २६ धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५, शेट वॉटसनने १४, रविंद्र जडेजाने १२ धावा केल्या.

दिल्लीकडून गोंलदाजी करताना कागिसो रबाडाने चार षटकांत २६ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. तर ऑनरीच नॉर्टजे याने २, अक्षर पटेलने १ बळी घेतला.

तत्पूर्वी, दिल्लीने २० षटकात ३ बाद १७५ धावा केल्या. सलामीवीर पृथ्वा शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला ९४ धावांची चांगली सलामी दिली. पृथ्वीने पहिल्या षटकात सलग दोन चौकार खेचत आक्रमक सुरुवात केली. शिखर धवनला सुरुवातील फटके खेळण्यास अडचणी येत होत्या. मात्र, काही चेंडू खेळल्यानंतर त्यानेही चेंडूवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पृथ्वीने ९ चौकार आणि एका षटकारासह ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर, धवनने ३ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर पंतला बढती मिळाली. त्याने या संधीचा फायदा घेत २७ चेंडूत नाबाद ३७ धावा चोपल्या. त्याच्या खेळीच ६ चौकारांचा समावेश होता. कर्णधार श्रेयस अय्यर २६ धावा करून बाद झाला. चेन्नईकडून फिरकीपटू पीयूष चावलाने ३३ धावांत २ तर, सॅम करनने २७ धावात १ बळी टिपला.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. या सत्राच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईला पराभूत करून दमदार आरंभ केला होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल्सने मात दिली. तर, पंजाब संघाविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा झालेला पहिला सामना आतापर्यंतचा हंगामातील सर्वात रंजक सामना होता. मार्कस स्टॉइनिसने फलंदाजी आणि गोलंदाजीत नैपुण्य दाखवत सामना एकहाती फिरवला.

आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दोन बदल करण्यात आले होते. अमित मिश्रा आणि आवेश खान यांना संधी देण्यात आली आहे. तर, चेन्नईने लुंगी एनगिडीच्या जागेवर जोश हेझलवुडला संघात स्थान दिले होते.

LIVE UPDATE :

  • दिल्लीचा पृथ्वी शॉ ठरला सामनावीर
  • ४४ धावांनी दिल्लीचा चेन्नईवर विजय
  • २० षटकांत चेन्नई ७ बाद १३१
  • शेवटच्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद
  • दिल्लीची विजयाकडे वाटचाल.
  • महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजाची जोडी मैदानात.
  • चेन्नईला विजयासाठी १२ चेंडूत ५५ धावांची गरज
  • चेन्नईला विजयासाठी १३ चेंडूत ५६ धावांची गरज.
  • केदार जाधव २६ धावांवर माघारी. नॉर्ट्जेने केले बाद.
  • केदार जाधव मैदानात. चेन्नईच्या दहा षटकात ३ बाद ४७ धावा.
  • अक्षर पटेलने केले ऋतुराजला धावबाद.
  • मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड ५ धावांवर धावबाद.
  • चेन्नईच्या ९ षटकानंतर २ बाद ४४ धावा.
  • चेन्नईच्या पाच षटकात १ बाद २६ धावा.
  • फाफ डु प्लेसिस मैदानात.
  • अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर फटका खेळताना वॉटसन झेलबाद.
  • चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन माघारी १४ धावांवर माघारी.
  • कगिसो रबाडा टाकतोय दिल्लीसाठी पहिले षटक.
  • चेन्नईचे सलामीवीर मुरली विजय आणि शेन वॉटसन मैदानात.
  • २० षटकात दिल्लीच्या ३ बाद १७५ धावा. पंतच्या ६ चौकारांसह २५ चेंडूत नाबाद ३७ धावा.
  • मार्कस स्टॉइनिस मैदानात.
  • कर्णधार श्रेयस अय्यर २६ धावांवर माघारी, सॅ करनने केले बाद.
  • अय्यर ७ तर पंत १५ धावांवर नाबाद.
  • १५ षटकानंतर दिल्लीच्या २ बाद १२४ धावा.
  • दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात.
  • पीयूष चावलाच्या गोलंदाजीवर धोनीने पृथ्वीला केले यष्टीचित.
  • दिल्लीला दुसरा धक्का, पृथ्वी शॉ ६४ धावांवर माघारी.
  • स्फोटक फलंदाज ऋषभ पंत मैदानात.
  • दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन ३५ धावांवर माघारी. पीयूष चावलाला मिळाला बळी
  • पृथ्वी ५६ तर, धवन ३० धावांवर नाबाद.
  • दिल्लीच्या १० षटकानंतर बिनबाद ८८ धावा.
  • पृथ्वीच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश, तर धवन २५ धावांवर नाबाद.
  • दिल्लीची दमदार सुरुवात. पृथ्वीचे ३५ चेंडूत अर्धशतक.
  • पृथ्वी शॉ २५ तर, शिखर धवन ३ धावांवर नाबाद.
  • पहिल्या पाच षटकांत दिल्लीच्या बिनबाद ३० धावा.
  • पृथ्वी शॉची दणक्यात सुरुवात.
  • पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ९ धावा.
  • पृथ्वी शॉने लगावला सामन्यातील पहिला चौकार.
  • चेन्नईकडून दीपक चहरने केली गोलंदाजीची सुरुवात.
  • दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन मैदानात.
  • दिल्ली संघात अमित मिश्रा आणि आवेश खान यांना संधी.
  • लुंगी एनगिडीला वगळून जोश हेझलवुडला चेन्नई संघात स्थान.
  • नाणेफेक जिंकून चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग XI - श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिखर धवन, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, मार्कस स्टॉइनिस, अमित मिश्रा, आवेश खान, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे.

चेन्नई सुपर किंग्जची प्लेईंग XI-महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, पीयूष चावला, शेन वॉटसन, मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, दीपक चहर, ऋतुराज गायकवाड, जोश हेझलवुड, सॅम करन.

Last Updated : Sep 26, 2020, 12:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details