महाराष्ट्र

maharashtra

IND VS ENG : पराभवानंतर जो रूट म्हणाला, भारताने आम्हाला...

By

Published : Feb 16, 2021, 8:09 PM IST

विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला जाते. त्यांनी आम्हाला तिन्ही आघाड्यावर पराभूत केले. या पराभवातून आम्हाला शिकण्यासाठी खूप आहे. आम्ही अशा वातावरणात खेळत आहोत की, जिथे फिरकी गोलंदाजांना फायदा मिळतो. अशा खेळपट्टीवर आम्हाला धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल, असे जो रुट म्हणाला.

india outplayed us it was an education for us england captain joe root
IND VS ENG : पराभवानंतर जो रूट म्हणाला, भारताने आम्हाला...

चेन्नई - एम. एम चिदंबरम येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे, विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला जाते. त्यांनी आम्हाला तिन्ही आघाड्यावर पराभूत केले, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने दिली. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

इंग्लंड संघाच्या पराभवावर जो रूट म्हणाला, 'विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला जाते. त्यांनी आम्हाला तिन्ही आघाड्यावर पराभूत केले. या पराभवातून आम्हाला शिकण्यासाठी खूप आहे. आम्ही अशा वातावरणात खेळत आहोत की, जिथे फिरकी गोलंदाजांना फायदा मिळतो. अशा खेळपट्टीवर आम्हाला धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल.'

आमच्या गोलंदाजांनी अशा खेळपट्टीवर, फलंदाजांवर दबाव निर्माण करणे शिकायला हवे. तसेच त्यांना एकाच फलंदाजांला सहा चेंडू खेळण्यासाठी भाग पाडावे लागेल. पहिल्या दिवशी आम्ही चांगली गोलंदाजी करत भारताला सहजासहजी धावा करू दिल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी चेपॉकच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते, असे देखील रुट म्हणाला.

उभय संघातील मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. पुढील दोन्ही सामन्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीसाठी आम्ही अतिरिक्त एक फिरकीपटू संघात खेळवू शकतो. तिसरा सामना डे-नाईट असून यात वेगळे आव्हान असेल, असेही रुट म्हणाला.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरूवात होणार आहे. हा सामना डे-नाईट खेळवला जाणार आहे.

हेही वाचा -IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 'या' खेळाडूला वगळलं

हेही वाचा -बधाई हो इंडिया... इंग्लंडच्या माजी खेळाडूने भारतीय संघाचे कौतुक करताना मारला टोमणा

ABOUT THE AUTHOR

...view details