महाराष्ट्र

maharashtra

नवलच..! ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पाकिस्तानच्या स्थानिक स्पर्धेत खेळणार

By

Published : Dec 27, 2020, 6:18 AM IST

नवीन वर्षात पाकिस्तान चषक एकदिवसीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत समर्स दक्षिण पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करेल. ८ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल.

Fast bowler Aaron Summers will become the first Australian to play domestic cricket in Pakistan
नवलच..! ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पाकिस्तानच्या स्थानिक स्पर्धेत खेळणार

नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आरोन समर्स पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. २४ वर्षीय 'अनकॅप्ड' (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला) समर्स उद्या सोमवारी पाकिस्तानात दाखल होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने समर्सबाबत माहिती दिली.

हेही वाचा -VIDEO : 'हाता खुजा रे थे क्या'; मोहम्मद सिराजची खास हैद्राबादी ढंगात मुलाखत

नवीन वर्षात पाकिस्तान चषक एकदिवसीय स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत समर्स दक्षिण पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करेल. ८ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. पीसीबीच्या देशांतर्गत स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येक संघासाठी एका विदेशी खेळाडूला समाविष्ट करण्याची परवानगी आहे. यासाठी, खेळाडूला घरगुती मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

आरोन समर्स

२०१९ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये समर्सने कराची किंग्जचे प्रतिनिधित्व केले होते. तो बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो. ''पाकिस्तान देश वेगवान गोलंदाजांसाठी ओळखला जातो. मला स्वत: ला एक उत्तम वेगवान गोलंदाज म्हणून विकसित व्हायचे आहे. मला पाकिस्तान चषक स्पर्धेतही माझ्या संघाला विजय मिळवून देण्यात मदत करायची आहे'', असे समर्सने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details