महाराष्ट्र

maharashtra

Ambati Rayudu Retirement : 5 वेळचा चॅम्पियन अंबाती रायडू आयपीएलमधून निवृत्त, वाचा कारकीर्द

By

Published : May 28, 2023, 10:03 PM IST

अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रायडूने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. गुजरात टायटन्स विरुद्धचा अंतिम सामना त्याचा अखेरचा आयपीएल सामना असेल.

Etv Bharat
Etv Bharat

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने मोठी घोषणा केली आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल 2023 चा अंतिम सामना त्याचा शेवटचा सामना असेल.

'आता यू टर्न नाही' :रायडूने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, 'मी मुंबई आणि सीएसके या दोन मोठ्या संघांसाठी खेळलो. 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आज रात्री सहावी ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे.' 37 वर्षीय रायडूने पुढे लिहिले की, 'हा एक लांब प्रवास आहे. मी ठरवले आहे की आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. मला ही स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. आता यू टर्न नाही.'

203 आयपीएल सामने खेळला : अंबाती रायडूने आजच्या अंतिम सामन्यापर्यंत 203 आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान त्याने 28.29 च्या सरासरीने 4320 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 22 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे. तथापि, आयपीएल 2023 चा हंगाम रायुडसाठी काही खास राहिला नाही. तो 15 सामन्यांत 15.44 च्या सरासरीने केवळ 139 धावाच करू शकला. आयपीएल 2023 मध्ये, अंबाती रायडूचा वापर बहुतेक सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केला गेला.

पाच वेळा आयपीएल जिंकले आहे :अंबाती रायुडूने 5 वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. त्याने 2013, 2015 आणि 2017 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी विजेतेपद पटकावले होते. चेन्नई संघाने 2018 आणि 2021 च्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले होते. रायडू देखील या संघाचा एक भाग होता.

गेल्या वर्षी निवृत्त होऊन निर्णय बदलला होता :रायुडूने गतवर्षी आयपीएलच्या मध्यावर एका ट्विटमध्ये अचानक निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्यानंतर लगेचच त्याने त्याचे ट्विट डिलीट केले होते. तेव्हा रायुडू म्हणाला होता की 2022 चा हा सीझन त्याचा शेवटचा असेल. मात्र, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी ही खोटी बातमी असल्याचे सांगून रायुडू निवृत्त होत नसल्याचे सांगितले. यावेळी रायुडूने निवृत्ती जाहीर केलेल्या ट्विटमध्ये तळाशी स्पष्टपणे लिहिले आहे की, यावेळी तो निवृत्तीचा निर्णय बदलणार नाही. म्हणजेच निवृत्तीतून तो यू-टर्न घेणार नाही. यावेळी त्याचा निवृत्तीचा इरादा पक्का आहे.

2019 मध्ये तडकाफडकी निवृत्ती :2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर पुनरागमन केले या आधी अंबाती रायुडूला 2019 वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकासाठी स्टँडबाय म्हणून त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर रायुडूने जुलै 2019 मध्ये तडकाफडकी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, दोन महिन्यांनंतर त्याने निवृत्ती सोडली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी 2018 मध्ये रायडूने मर्यादित षटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

अंबाती रायुडूची कारकीर्द : रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47.05 च्या सरासरीने 1,694 धावा केल्या आहेत. नाबाद 124 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकेही झळकावली. रायुडूने 6 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 10.50 च्या सरासरीने केवळ 42 धावा केल्या आहेत. याशिवाय रायुडूच्या नावावर 97 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 6,151 धावा आहेत.

हेही वाचा :

  1. IPL 2023 : अहमदाबादमध्ये पावसाचा वेग वाढला, मैदान पुन्हा कव्हर्सने झाकले

ABOUT THE AUTHOR

...view details