महाराष्ट्र

maharashtra

Asia Cup 2022 Final : श्रीलंकेने पाकिस्तानवर मात केल्यानंतर अफगाणिस्तानने साजरा केला आनंद

By

Published : Sep 12, 2022, 3:19 PM IST

आशिया चषक ( Asia Cup 2022 ) विजेतेपदाच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 147 धावांवर आटोपला. त्यामुळे अफगाणिस्तान चाहत्यांनी देखील श्रीलंकेचा विजय साजरा केला.

Asia Cup
आशिया चषक

नवी दिल्ली: श्रीलंकेने रविवारी आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला ( Sri Lanka defeated Pakistan by 23 runs ). तसेच श्रीलंका सहाव्यांदा आशियाचा चॅम्पियन बनला ( Sri Lanka Asian champion sixth time ). या विजयानंतर बेटावरील देशातील लोक खूप उत्साहात होते. विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. इतकेच नाही तर त्यांचा विजय अफगाणिस्तान चाहत्यांनी देखील साजरा केला.

आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 6 बाद 170 धावा केल्या. यामध्ये भानुका राजपक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या, तर वनिंदू हसरंगाने 36 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने तीन बळी घेतले ( Haris Rauf took three wickets ). श्रीलंकेने सुपर 4 टप्प्यातील सामन्यात ( PAK vs SL ) पाकिस्तानवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीतही त्यांचा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत श्रीलंकेचा संघ एकच सामना हरला.

अफगाणिस्तानचे चाहत्यांनी पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद मोठ्या दिमाखात साजरा ( Afghans celebrate sri lanka win )केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघानेच अफगाणिस्तानचा पराभव केला होता. खेळ सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा राजधानी काबूलच्या रस्त्यांवर चाहत्यांनी गर्दी करत जल्लोष केला. अफगाण चाहत्यांचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ श्रीलंकेतील अफगाणिस्तानचे राजदूत मोहम्मद अश्रफ हैदरी ( Ambassador of Afghanistan Mohammad Ashraf Haidari ) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना अफगाणिस्तानच्या राजदूताने लिहिले ( Afghanistans ambassador shared the video ) की, "जगभरातील अफगाण लोक आशिया कप क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये महान श्रीलंकन ​​संघाचा विजय साजरा करत आहेत. हे फक्त खोस्टमधील दृश्य आहे. विविधता, लोकशाही आणि बहुसंख्याकता आणि असहिष्णुता आणि दहशतवादाविरुद्ध खेळ हा मैत्रीचा आधार आहे. 38 वर्षात श्रीलंका संघ चॅम्पियन होण्याची ही सहावी वेळ आहे. श्रीलंकेने यापूर्वी 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये आशिया चषक जिंकले होते.

हेही वाचा -Asia Cup 2022 : आशिया चषक श्रीलंकेच्या नावावर.. पाकिस्तानला चारली धूळ, २३ धावांनी केला पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details