महाराष्ट्र

maharashtra

AB de Villiers Big Statement : पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये परतेन - एबी डिव्हिलियर्स

By

Published : May 24, 2022, 6:53 PM IST

काही महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सने आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला नव्हता. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. तो पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स संघात कमबॅक करणार आहे.

AB de Villiers
AB de Villiers

मुंबई:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore team ) संघ सलग तिसऱ्या वर्षी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. आयपीएल 2022 मधील प्लेऑफमध्ये दाखल होणारा आरसीबी चौथा संघ आहे. त्यानंतर आरसीबी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हॉल ऑफ फेमर एबी डिव्हिलियर्सने पुष्टी केली आहे की, तो पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी फ्रेंचायझीमध्ये परतणार ( AB de Villiers will return to IPL ) आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सला काही दिवसापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. तो पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी फ्रेंचायझीमध्ये परतणार आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सने आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला नाही, ज्यामध्ये आरसीबी बुधवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. तो म्हणाला की तो कोणत्या रूपात परतणार आहे हे अद्याप माहित नाही.

डिव्हिलियर्सने व्हीयूएसपोर्टला सांगितले की, मी पुढील वर्षी आयपीएलमध्ये नक्कीच परतेन. मला माझ्या दुसऱ्या घरी परतायला आवडेल. मी पुढील वर्षी आरसीबीमध्ये परतेन, मला ती खंत जाणवत आहे. मी कोणत्या रुपात परतेन हे माहित नाही, पण मला माझे दुसरे घर चिन्नास्वामी स्टेडियमला ​​भेट द्यायला आवडेल. मी त्याची वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलसह आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले होते.

एबी डिव्हिलियर्सने 228 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 9,577 धावा केल्या आहेत. तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सर्व काळातील महान क्रिकेटपटूंपैकी एक मानला जाणारा खेळाडू आहे. डिव्हिलियर्स एप्रिल 2008 मध्ये भारताविरुद्ध 217 धावा करत कसोटीत द्विशतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला.

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या डिव्हिलियर्सने जानेवारी 2018 मध्ये अनुक्रमे 16 चेंडू अर्धशतक आणि 31 चेंडूत शतक या दोन्ही कामगिरी करणार एकमेव खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 170 डावांमध्ये 38.70 च्या सरासरीने आणि 151.68 च्या स्ट्राइक रेटसह 5,162 धावा केल्या आहेत.

हेही वाचा -Ipl 2022 1st Qualifier Rr Vs Gt : गुजरात टायटन्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे चॅलेंज; कोण पटकावणार फायनलचे तिकिट?

ABOUT THE AUTHOR

...view details