महाराष्ट्र

maharashtra

सुपरफिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन...!

By

Published : Jun 21, 2021, 6:47 PM IST

सुपरफिट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी

योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे. आणि या कोरोना काळात तर नकारात्मकतेवर विजय मिळविण्यासाठी योग सारखं दुसरं प्रभावी अस्त्र नाहीये. गेल्या ७ वर्षांपासून दरवर्षी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात दीर्घ म्हणजेच मोठा दिवस आहे आणि योग देखील मनुष्याला दीर्घ आयुष्य प्रदान करतो.

शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

गेल्या वर्षी ची थीम ‘योगा ॲट होम अँड योगा विथ फॅमिली’ अशी होती तर यावर्षीच्या योग दिनाची थीम ‘बी विथ योगा, बी ॲट होम’ अशी आहे. अनेक सेलिब्रिटीज योगासनांच्या प्रेमात असून अभिनेत्री आणि त्या लिस्ट मध्ये फिटनेस एक्सपर्ट शिल्पा शेट्टी कुंद्रा हिचे नाव आघाडीवर आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे योग-प्रेम सर्वज्ञात आहे. लोकांना तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवर योग बद्दलच्या टिप्स मिळत असतात आणि त्याचबरोबर त्याचे फायदे आणि महत्त्व याबद्दल ती लोकांना अवगत करीत असते. तसेच ती सर्वांना योग करण्यासाठी उद्युक्त करीत असते आणि निरोगी जीवनशैली अंगिकारण्यास प्रोत्साहित करीत असते.

शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच योग बद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "योग केवळ शारीरिक शक्ती वाढविण्यासाठीच नव्हे तर मानसिक तंदुरुस्ती आणि संतुलन मिळविण्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. योगासनांमधील प्रत्येक पोज शरीरात ऊर्जा केंद्रित करण्यास आणि जतन करण्यास मदत करते. भलेही कोरोना ने प्रत्येकाच्या जीवनात उलथापालथ केली असली तरी या व्हायरसने आपल्याला निरोगी जीवनशैली अंगिकारण्याचे महत्त्व शिकवले आहे. आपल्या जीवनात, आपल्या शरीरात, आपल्या मनात चमत्कार घडवून आणण्यासाठी दिवसाची किमान १० मिनिटे स्वतःच्या शरीर आणि मनावर समर्पित करा."

शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

शिल्पा शेट्टी कुंद्राचे नाव नेहमीच आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. लग्न आणि मातृत्व देखील तिच्या मते महत्वाचे आहे म्हणूनच व्यावसायिकदृष्ट्या आघाडीवर असतानाही शिल्पा शेट्टी कुंद्रा ने ‘फॅमिली ब्रेक’ घेतला. आता तब्बल एका तापानंतर ती 'निकम्मा' चित्रपटातून अभिनय-वापसी करतेय. तिचा अजून एक चित्रपट 'हंगामा २' सुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्राने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

हेही वाचा - मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details