महाराष्ट्र

maharashtra

शिल्पा शेट्टीसोबत 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सेटवर दिसली शहनाज गिल - पाहा व्हिडिओ

By

Published : Feb 8, 2022, 4:43 PM IST

इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोच्या आगामी भागामध्ये शहनाज दिसणार आहे. या शोचे मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू आहे. यासाठी आलेल्या शहनाझने व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर उभ्या असलेल्या हौशी फोटोग्राफर्ससाठी पोज दिली.

शिल्पा शेट्टीसोबत शहनाज गिल
शिल्पा शेट्टीसोबत शहनाज गिल

मुंबई- अभिनेत्री गायिका शहनाज गिल मंगळवारी मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत स्पॉट झाली. इंडियाज गॉट टॅलेंट या रिअॅलिटी शोच्या आगामी भागामध्ये शहनाज दिसणार आहे. या शोचे मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू आहे.

व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर उभ्या असलेल्या हौशी फोटोग्राफर्ससाठी पोज देत असताना शहनाज काळ्या पोशाखात दिसली. सेटवरील तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले. इंडियाज गॉट टॅलेंट सेटवरील दुसर्‍या व्हिडिओमध्ये, शहनाज शोच्या जज पॅनेलवर शिल्पा शेट्टीसोबत पोज देताना दिसत आहे.

बिग बॉस 15 च्या अंतिम फेरीत दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला श्रद्धांजली वाहिल्यामुळे शहनाज अलीकडेच चर्चेत आली होती. शोमध्ये तिच्या उपस्थितीने सुपरस्टार होस्ट सलमान खानला भावूक केले होते. सिद्धार्थ आणि शहनाज यांना चाहत्यांकडून 'सिडनाझ' म्हटले जात असे. ते दोघे बिग बॉसच्या घरात असताना एकमेकांच्या जवळ आले, तरीही त्यांनी कधीही अधिकृतपणे जोडपे असल्याचे कबूल केले नव्हते.

वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या सिद्धार्थच्या स्मरणार्थ शहनाझने 'तू यहीं है' हा म्यूझिक व्हिडिओ 2 सप्टेंबर 2021 रोजी रिलीज केला होता.

हेही वाचा -वाढदिवसानिमित्त ३०० मुलांना खाऊ वाटप केल्याचे पाहून नोरा फतेहीच्या डोळ्यात आनंदाश्रू

ABOUT THE AUTHOR

...view details