महाराष्ट्र

maharashtra

'आश्रम'चा दुसरा भाग ११ नोव्हेंबरला, प्रकाश झा यांनी केली घोषणा

By

Published : Oct 17, 2020, 1:46 PM IST

आश्रम या वेब सीरिजचा दुसरा भाग ११ नोव्हेंबरला रिलीज होणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रकाश झा यांनी केली आहे. 'आश्रम चॅप्टर २ : द डार्क साईड' असे या नव्या भागाचे शीर्षक असेल.

second part of 'Ashram'
'आश्रम'चा दुसरा भाग

मुंबई - प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम’ ही ‘वेब सीरिज’ २८ ऑगस्ट या दिवशी ‘एम् एक्स प्लेयर’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर प्रदर्शित झाली होती. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली असून येत्या ११ नोव्हेंबरला आश्रम मालिकेचा दुसरा भाग प्रसारित होईल. एमएक्स प्लेयरवर याचे प्रसारण होणार आहे.

प्रकाश झा यांनी नव्या सिझनची घोषणा केल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 'आश्रम चॅप्टर २ : द डार्क साईड' असे या नव्या भागाचे शीर्षक असेल.

अभिनेता बॉबी देओल याने या वेब सीरिजमध्ये ‘बाबा निराला’ या नावाची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेला विरोध करण्याचा प्रयत्नही काही संघटनांनी केला होता. मात्र प्रेक्षकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला होता. पहिला भाग जिथे संपला तिथून नव्या भागाची सुरुवात होईल. त्यामुळे प्रेक्षकांची उस्तुकता वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details