महाराष्ट्र

maharashtra

वन्‍यजीवाच्‍या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्‍ट देणारी रिअल-लाइफ ड्रामा सिरीज 'सेरेंगेटी २’!

By

Published : Oct 19, 2021, 10:25 PM IST

सेरेंगेटी २’!

सोनी बीबीसी अर्थने ‘सेरेंगेटी’ नावाची सिरीज आणली होती. आता ते सेरेंगेटी चा दुसरा भाग घेऊन येत आहेत जी आफ्रिकेच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठी रिअल-लाइफ ड्रामा सिरीज असेल. नवीन पात्रं, नवीन कथा, नवीन वळण, नवीन संकट, नवीन संघर्ष, पण त्याच अद्भुत सेटिंगसह सोनी बीबीसी अर्थ 'सेरेंगेटी २’ च्‍या माध्‍यमातून वन्यजीवांची आणखी एक रोमांचकारी कथा घेऊन येत आहे. वन्‍यजीवाच्‍या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्‍ट देत आपल्‍या विचारसरणीपेक्षाही अधिक प्राणी आपल्‍यासारखे आहेत या तथ्‍याला प्रकाशझोतात आणण्‍याचा प्रयत्न यातून केला गेला आहे.

आफ्रिकेच्या घनदाट जंगलाचे आकर्षण अनेकांना असते. परंतु तेथे भेट देण्यास सर्वांना जमतेच असे नाही त्यामुळे सोनी बीबीसी अर्थने ‘सेरेंगेटी’ नावाची सिरीज आणली होती. आता ते सेरेंगेटी चा दुसरा भाग घेऊन येत आहेत जी आफ्रिकेच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठी रिअल-लाइफ ड्रामा सिरीज असेल. नवीन पात्रं, नवीन कथा, नवीन वळण, नवीन संकट, नवीन संघर्ष, पण त्याच अद्भुत सेटिंगसह सोनी बीबीसी अर्थ 'सेरेंगेटी २’ च्‍या माध्‍यमातून वन्यजीवांची आणखी एक रोमांचकारी कथा घेऊन येत आहे. वन्‍यजीवाच्‍या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्‍ट देत आपल्‍या विचारसरणीपेक्षाही अधिक प्राणी आपल्‍यासारखे आहेत या तथ्‍याला प्रकाशझोतात आणण्‍याचा प्रयत्न यातून केला गेला आहे.

‘सेरेंगेटी २’ हा शो आफ्रिकेच्या अस्पृश्य प्रदेशांतील प्राण्यांच्या नाट्यमय आणि भावनिकपणे एकमेकांशी जोडलेल्या कथा दाखवतो. विनोद, हृदयभंग आणि तणावाने भरलेली, नवीन पात्रं अद्वितीय प्राणी वर्तनाच्या शोधात निघाली आहेत. मानवी जीवनाशी त्यांचे कसे आणि काय साम्य आहे हे ते शोधून काढणार आहेत. सेरेंगेटी २ ही मालिका बकरी जातीतील बबून म्हणजेच मोठा वानर, काली सिंहीण, बिबट्यांच्‍या त्‍यांच्‍या प्रेमळ पिल्‍लांसोबतचा कळप आणि अनेक नवीन प्राणी-पात्र अशा आफ्रिकन वन्‍यजीवाच्‍या हृदयस्‍पर्शी कथांना दाखवतो.

अत्‍याधुनिक स्थिर कॅमेरा यंत्रणा, कलाटणी देणा-या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले आधुनिक ड्रोन्‍स यांचा वापर करत 'सेरेंगेटी २’ प्राण्‍यांच्‍या व्‍यापक व सहानुभूतीपूर्ण वर्तनाला सादर करतो. अकॅडमी पुरस्‍कार-प्राप्‍त अभिनेत्री (स्‍टार वॉरर्स व ब्‍लॅक पॅन्‍थर प्रसिद्धीप्राप्‍त) लुपिता एनयाँग यांची पटकथा आणि जॉन डाऊनर व सायमन फुलर निर्मिती शो वन्‍यजीवनामधील निसर्गाच्‍या सर्वात लक्षवेधक पात्रांच्‍या जीवनांना अधोरेखित करणारे जटिल नाते, थरारक संघर्ष व कोमल क्षणांचा आनंद देतो.

६ एपिसोड्स या प्राणी पात्रांच्‍या विविध टप्‍प्‍यांना दाखवण्यासोबत त्‍यांच्‍या नात्‍यामधील अद्वितीय गतीशीलता, वर्तन, क्षमता व कमकुवतपणाचा उलगडा करतात. प्रत्‍येक एपिसोड दुष्टपणा, परिवर्तन, नाविन्यता, क्षमता आणि अंदाज यासह त्यांच्या जीवन प्रवासाच्‍या विभिन्‍न पैलूंना दाखवतो. शोची अद्वितीय खासियत सादर करण्‍यासाठी सोनी बीबीसी अर्थ यांसदर्भात महिनाभर सोशल मीडियावर मोहिम राबवत आहे. तसेच तरुणाई व जनसामान्यांमध्ये शोची लोकप्रियता वाढवण्‍यासाठी सोनी बीबीसी अर्थ सोशल मीडिया प्रभावक व स्‍टार्ट-अप कॉमेडीयन्‍स, जोस कॅवेको व सोरभ पंत, यांच्‍या सहयोगाने ब्रॅण्‍डेड कन्‍टेन्‍ट निर्माण करत आहे.

चीफ मार्केटिंग ऑफिसर व व्‍यवसाय प्रमुख, इंग्लिश क्‍लस्‍टर व सोनी एएटीएच, सोनी पि‍क्‍चर्स नेटवर्क्‍स, तुषार शाह म्हणाले, '''सेरेंगेटी २' सह आम्‍हाला पुन्‍हा एकदा अग्रणी सिरीज सादर करण्‍याचा आणि प्रेक्षकांना प्राण्‍यांच्‍या अनपेक्षित वर्तनाचा अनुभव देण्‍याचा आनंद होत आहे. जागतिक स्‍तरावर शोची भरभरून प्रशंसा करण्‍यात आली आहे आणि भारतामध्‍ये ही सिरीज सादर करत असताना आम्‍ही प्रेक्षकांना संपन्‍न, मनोरंजनपूर्ण व माहितीपूर्ण अनुभव देणार आहोत.”

६ एपिसोड्सची मालिका 'सेरेंगेटी २’ १८ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता सोनी बीबीसी अर्थ वर प्रसारित झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details