महाराष्ट्र

maharashtra

‘लायन्स’ आणि ‘मायनस थ्री’ या डान्स ग्रुप्सनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत पटकावले मानाचे स्थान!

By

Published : Oct 16, 2021, 10:59 PM IST

‘लायन्स’ आणि ‘मायनस थ्री’ डान्स ग्रुप्स
‘लायन्स’ आणि ‘मायनस थ्री’ डान्स ग्रुप्स

लायन्स आणि मायनस थ्री या दोन्ही डान्स ग्रुप्सनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या हिप हॉप स्पर्धेत लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री ग्रुपही दहावं स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. तमाम भारतीयांसाठी आणि हिप हॉप प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

सध्या भारतातही जागतिक नृत्यप्रकारात माहीर नर्तक तयार झालेले आहेत. अमेरिकेत जन्मलेला आणि प्रस्थापित झालेला ‘हिप हॉप’ प्रकार आपल्या देशातही पॉप्युलर आहे. इतकंच काय त्यातील काहींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळवलंय. लायन्स आणि मायनस थ्री या दोन्ही डान्स ग्रुप्सनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या हिप हॉप स्पर्धेत लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री ग्रुपही दहावं स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. तमाम भारतीयांसाठी आणि हिप हॉप प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

मी होणार सुपरस्टार स्पर्धेतील दोन स्पर्धकांनी अख्ख्या भारताचं लक्ष्य वेधून घेतलं. एक म्हणजे द लायन्स ग्रुप आणि दुसरा मायनस ३ ग्रुप. गेली काही वर्षे हे दोन्ही संघ हिप हॉप ही डान्स स्टाईल परफॉर्म करत आहेत. वर्ल्ड हिप हॉप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करावे या विचारांनी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवला. त्यांचे लक्ष्य होते अमेरिकेत होणारी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धा जिंकणं. ही स्पर्धा हिप हॉप करणाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत मानाची समजली जाते. याआधी लायन्स आणि मायनस यांनी भारतात होणाऱ्या हिप हॉप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलं असल्यामुळे त्यांना वर्ल्ड हिप हॉपमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. लायन्स हा ७ जणांचा ग्रुप आहे. त्यांनी अडल्ट क्रु या प्रकारात सादरीकरण केलं. तर मायनस ३ यांनी मिनी क्रु या विभागात भाग घेतला. दरवर्षी ही स्पर्धा अमेरिकेत होते पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत १७० देशांनी एन्ट्री पाठवल्या होत्या. अटीतटीच्या या स्पर्धेत लायन्स आणि मायनस ३ या दोन्ही संघाची निवड होणं हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

आता महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हे लायन्स आणि मायनस थ्री हे दोन्ही ग्रुप सध्या स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाचा भाग आहेत. त्यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकलेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘मी होणार सुपरस्टार’ मधील जबरदस्त टॅलेण्ट, या टॅलेण्टला पारखणारा सुपरजज अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे आणि संस्कृती बालगुडेचं दिमखदार सुत्रसंचालन यामुळे या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. आपल्या नृत्यामुळे जग जिंकणारे कलाकार मी होणार सुपरस्टारच्या मंचावर आहेत याचा सार्थ अभिमान स्टार प्रवाह वाहिनीला आहे.

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. डान्सचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी असाच एक मंच उभारला तो स्टार प्रवाह वाहिनीने. स्पर्धकांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सुरू झाला एक प्रवास तो म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष डान्सचा’. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं आणि त्यातील ४ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी आणि त्यातून विजेता ठरेल महाराष्ट्राचा सुपरस्टार.

लासन्सच्या टीमचा नृत्यदिग्दर्शक बालाजी म्हणाला, ‘मागील वर्षी आपण या स्पर्धेत ५२ व्या क्रमांकावर होतो. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. भारताला तिथून पहिल्या क्रमांकावर आणणे हे आमचे स्वप्न होते. कांस्य पदक आणि रौप्य पदक यांचे एकूण गुण सारखेच होते. तर गोल्ड मेडल मिळालेल्या संघात आणि लायन्सच्या परफॉर्मन्स मध्ये फक्त ०.१२ इतका छोटा फरक होता. पुढच्या वर्षी सुवर्णपदक आणायचे आमचे ध्येय आहे असे बालाजी याने सांगितले.’ मायनस ३ मधील सुजिन म्हणाला, ‘पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही टॉप १० मध्ये येणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे.’

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ हा कार्यक्रम स्टार प्रवाहवर प्रसारित होतो.

हेही वाचा - बालकाला जीवदान देण्यासाठी फराह खानने उभी केली 16 कोटींची मदत

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details