महाराष्ट्र

maharashtra

लोकप्रिय पार्श्वगायिका देवकी पंडित यांनी ‘इंडियन आयडल मराठी' च्या मंचावर लावली हजेरी!

By

Published : Mar 26, 2022, 3:43 PM IST

'इंडियन आयडल मराठी' च्या मंचावर देवकी पंडित यांच्याकडुन रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे. तब्ब्ल १७ वर्षांनी देवकी पंडित पुन्हा एकदा रिऍलिटी शोमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहे.

देवकी पंडित इंडियन आयडल मराठीच्या मंचावर
देवकी पंडित इंडियन आयडल मराठीच्या मंचावर

लोकप्रिय संगीतकार अजय अतुल ‘इंडियन आयडल मराठी' मध्ये परीक्षकांच्या भूमिकेत दिसताहेत. त्यामुळे अनेक हिंदी-मराठी संगीतक्षेत्रातील दिग्गज कलाकार पाहुणे म्हणून या मंचाला भेट देताना दिसताहेत. आता इथे लोकप्रिय पार्श्वगायिका देवकी पंडित यांनी हजेरी लावली. अर्थातच त्यांच्या येण्याने स्पर्धकांना वेगळी शिकवणी मिळाली आणि त्यामुळे ते सर्वजण हरखून गेले होते.

देवकी पंडित हे मराठी संगीत जगतातलं एक आदरणीय नाव. शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या, मालिकांची शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी रसिकांच्या मंचावर राज्य केलं. गेल्या तीन दशकांपासून देवकी पंडित संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपांत, वेगवेगळ्या प्रयोगांमधून त्यांची स्वरप्रतिभा रसिकांसमोर येत आहे.

'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगत चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता महाराष्ट्राला मिळणार आहे. 'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' ही टॅगलाईन असलेला हा स्वप्नपूर्तीचा मंच खरंच रत्न घडवतो आहे. सध्या महाराष्ट्राला टॉप ६ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळते आहे. लोकप्रिय गायिका देवकी पंडित यांनी ‘इंडियन आयडल मराठी' च्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

देवकी पंडित यांची संगीतावर असलेली पकड, त्यांचा अभ्यास या सगळ्याने प्रत्येक नवोदित गायकाला मार्गदर्शन मिळतं. 'इंडियन आयडल मराठी' च्या मंचावर देवकी पंडित यांच्याकडुन रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे. तब्ब्ल १७ वर्षांनी देवकी पंडित पुन्हा एकदा रिऍलिटी शोमध्ये रसिकांना बघायला मिळणार आहे. देवकी पंडित यांचं मार्गदर्शन आणि स्पर्धकांची सुरेल गाणी ऐकायला मिळतील येत्या २८ ,२९ आणि ३० मार्च रोजी रात्री ९ वाजता ‘इंडियन आयडल मराठी' मध्ये जो प्रसारित होतो सोनी मराठी वाहिनीवर.

ABOUT THE AUTHOR

...view details