महाराष्ट्र

maharashtra

Indian Idol Marathi : निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे जागवणार नव्वदीच्या दशकातील गाण्याच्या आठवणी

By

Published : Mar 12, 2022, 10:28 AM IST

सोनी मराठीवर सुरु झालेला ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवितात. आता यात दोन सुप्रसिद्ध अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचाला भेट देणार असून प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्यात त्याबद्दल उत्साह आहे.

निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे
निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. सोनी मराठीवर सुरु झालेला ‘इंडियन आयडल मराठी’ कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवितात. आता यात दोन सुप्रसिद्ध अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे लवकरच ‘इंडियन आयडल मराठी’ च्या मंचाला भेट देणार असून प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्यात त्याबद्दल उत्साह आहे. हा सांगीतिक कार्यक्रम सुरुवातीपासूनच त्यातील बहारदार परफॉर्मन्सेसमुळे प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे.

अजय-अतुल सारखी लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. यंदाच्या आठवड्यात अभिनयाच्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज अभिनेत्री मंचावर येणार आहेत. ९० चं दशक गाजवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेतला.

'इंडियन आयडल मराठी'च्या आगामी भागात सुरांच्या मंचावर आठवणींचा पेटारा उघडला जाणार आहे. निवेदिता आणि प्रिया यांनी त्यांच्या आठवणी सांगून, त्यांच्या कामाविषयी बोलून सगळ्यांनाच ९०च्या दशकात नेलं. स्पर्धकांनाही स्वतःच्या आवडीची गाणी सादर करण्याची मुभा असल्याने एकंदरीतच येणारा आठवडा प्रेक्षकांसाठी विशेष असेल यात शंका नाही. या भागात स्पर्धक विविध प्रकारची सुरेल गाणी सादर करणार आहेत.

‘इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते बुधवार, रात्री ९ वाजता प्रसारित होतो.

हेही वाचा -'झुंड'ला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अमिताभने मानले प्रेक्षकांचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details