महाराष्ट्र

maharashtra

'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा

By

Published : Nov 26, 2020, 12:54 PM IST

अभिनेता बॉबी देओलच्या आश्रम या वेब सिरीजचे दोन सिझन प्रेक्षकांना आवडले आहेत. त्याबद्दल बॉबीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आता या मालिकेचा तिसरा सिझन प्रसारित होणार असून यासाठी तो सज्ज झाला आहे.

Bobby Deol
बॉबी देओल

मुंबई - बॉबी देओल याची प्रमुख भूमिका असलेल्या 'आश्रम' या वेब मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मालिकेच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांनी पसंत केले. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या सिझनसाठी बॉबी उत्सुक आहे. 'आश्रम' वेब मालिकेत बॉबीने बाबा निराला ही व्यक्तीरेखा साकारली होती.

हेही वाचा - नोरा फतेहीचा 'दिलबर' गाण्यावर डान्स धमाका

'आश्रम' वेब सिरीजल्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बॉबीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, ''मी तिसऱ्या सिझनची प्रतीक्षा करीत आहे. 'आश्रम'ला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांचा आभारी आहे.''

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण बिहार निवडणुकीपुरतेच - पालकमंत्री दादा भुसे

या मालिकेत बॉबी देओलने काशीपुरवाले बाबा निराला उर्फ मॉन्टी ही भूमिका साकारली आहे. यात आदिती पोहोनेरकर, तुशार पांडे, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनिल रस्तोगी, सचिन श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मॅक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका स्ट्रिमिंग होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details