महाराष्ट्र

maharashtra

विकी कौशलचे इन्स्टाग्रामवर झाले ९० लाख चाहते

By

Published : Aug 17, 2020, 10:31 PM IST

अभिनेता विकी कौशल याची इन्स्टाग्रामवर ९ मिलीयन फॅन फॉलोअर्स झाले आहेत. त्याने ही आनंदाची बातमी आपल्या तमाम चाहत्यांना दिली आहे.

Vicky Kaushal
विकी कौशल

मुंबई :बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विक्की कौशलची आता इन्स्टाग्रामवर ९० लाख फॉलोअर्स झाले आहेत. आपल्या वाढत्या सोशल मीडिया फॅमिलीबद्दल उत्साह व्यक्त करण्यासाठी या अभिनेत्याने इन्स्टाग्रामच्या क सोशल मीडिया परिवारात वाढ झाल्याची ही आनंदाची बातमी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली आहे. त्यांनी लिहिले: "परिवार वाढत आहे...९ मिलीयन."

बॉलिवूडमधील सर्वात आशादायक कलाकारांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकीने नुकताच स्वत: च्या 'राझी' या चित्रपटातील 'ऐ वतन' या गाण्यावर सितार वाजवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी, विकीने आपण कॅमेऱ्याच्या मागे काम करीत असतानाची आठवण चाहत्यांना शेअर केली होती.

विकी कौशलचे इन्स्टाग्रामवर झाले ९० लाख चाहते

अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपुरच्या सेटवरील एक फोटो त्याने शेअर केला होता. या चित्रपटात त्याने सहाय्यक म्हणून काम केले होते. विक्कीने लिहिले: " २०१०- जब हम फ्रेम से बहार खडे हुआ करते थे.#GangsOfWasseypur."

नीरज घायवानच्या मसान चित्रपटातून पदार्पण करण्यापूर्वी विक्कीने अनुराग कश्यपला गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन भागामध्ये सहाय्यक म्हणून मदत केली, त्यानंतर कश्यपच्या लव्ह शुव ते चिकन खुराना आणि बॉम्बे वेलवेटमध्ये त्याने हजेरी लावली होती.

नॅशनल अवॉर्डविजेता विकी कौशल, भानु प्रताप सिंगच्या भूत पार्ट वन: द हॉन्टेड शिपमध्ये शेवटचा दिसला होता. त्यानंतर तो शूजित सरकर यांच्या सरदार 'उधम सिंग'मध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details