महाराष्ट्र

maharashtra

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा-नाग चैतन्याने केली घटस्फोटाची घोषणा

By

Published : Oct 2, 2021, 8:23 PM IST

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर आज (शनिवार) घटस्फोट घेत असल्याची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. नाग चैतन्याने ट्विटरद्वारे आणि समंथा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

Tollywood actors Naga Chaitanya, Samantha announced their separation
दक्षिणात्य अभिनेत्री समंथा-नाग चैतन्याने केली घटस्फोटाची घोषणा

हैदराबाद -दक्षिणात्य अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर आज (शनिवार) घटस्फोट घेत असल्याची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. नाग चैतन्याने ट्विटरद्वारे आणि समंथा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे.

अभिनेता नाग चैतन्य याने केलेले ट्वीट

आमचा खाजगीपणा सुरक्षित ठेवा -

चैतन्य यांने आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, अनेकांशी चर्चा आणि सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. सॅम आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहेत की, आमची मैत्री ही एका दशकापेक्षा जास्त आहे, ती आमच्या नाताचा आधार होती. ती आमच्यात नेहमीच विशेष नाते ठेवेल. आम्ही चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, या कठीण प्रसंगात आम्हाला मदत करा आणि आम्हाला समोर जाण्यासाठी आमचा खाजगीपणा सुरक्षित ठेवा. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.

अभिनेत्री समंथा हिने केलेली पोस्ट

'या’मुळे रंगली घटस्फोटाची चर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून समंथा अक्किनेनी आणि नाग चैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चा ही सुरू होती. अखेर आज या दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. काही दिवसांपूर्वी समंथा अक्किनेनीने आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलमधून अक्किनेनी हे नाव काढून टाकले होते. यामुळे त्यांच्या नात्यामध्ये काहीतरी दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. आज त्या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून या बाबीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा -रितेशची पत्नी जेनेलियाने दिले 'व्हल्गर आंटी' म्हणणाऱ्याला सडेतोड उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details