महाराष्ट्र

maharashtra

Samantha on Oo Antava success: 'ऊं ऊं अंटवा'साठी अल्लू अर्जुनचे सामंथाने मानले आभार

By

Published : Jan 12, 2022, 3:24 PM IST

समंथा रुथ प्रभू
समंथा रुथ प्रभू ()

सामंथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu ) अल्लू अर्जुनला ( Allu Arjun ) पुष्पा: द राइज मधील ( Pushpa: The Rise Movie ) 'ऊं ऊं अंटवा' हा डान्स नंबर स्वीकारण्यास राजी केल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. गाण्याला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सामंथा म्हणाली की तिला गाणे कसे होईल याबद्दल खात्री वाटत नव्हती.

हैदराबाद (तेलंगणा): 'पुष्पा' चित्रपटातील दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सामंथा रुथ प्रभूचे ( Samantha Ruth Prabhu ) सध्या आयटम साँगमधील स्क्रीन प्रेझेन्ससाठी कौतुक होत आहे. 'ऊं ऊं अंटवा' ( Oo Antava ) हे तिचे पहिले खास गाणे असल्याने सामंथा म्हणाली की ती हे करण्यास नाखूष होती, परंतु अल्लू अर्जुनच्या प्रेरणेने तिला ही संधी मिळाली.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ( Allu Arjun and Rashmika Mandanna ) यांच्या मुख्य भूमिका असलेला सुकुमार दिग्दर्शित पुष्पा: द राईज ( ( Pushpa: The Rise Movie ) ) हा सध्या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात सामंथाने एक डान्स नंबर केला आहे. 'ऊं ऊं अंटवा' असे शीर्षक असलेले गाणे तिला करण्यापूर्वी खात्री वाटत नव्हती. मात्र अल्लू अर्जुनने तिची समजूत घातली व ती या गाण्यासाठी तयार झाली. आज हे गाणे लोकप्रिय ठरल्यानंतर गाण्याची संधी दिलेल्या अल्लू अर्जुनचे तिने आभार मानले आहे.

"अनेक अडथळे आले होते. गाणे कसे होईल या भीतीने मी तयार नव्हते. पण अल्लू अर्जुनने बसून मला समजावले. त्याच्या प्रोत्साहनाशिवाय मी 'ऊं ऊं अंटवा' करणे स्वीकारले नसते", असे सामंथा म्हणाली. "आता हे गाणे देशभरात व्हायरल झाले आहे, मला अल्लू अर्जुनचे आभार मानावे लागतील", असेही ती पुढे म्हणाली. अल्लू अर्जुन आणि सामंथा यांनी यापूर्वी त्रिविक्रम श्रीनिवासच्या S/O सत्यमूर्तीच्या सुपरहिट चित्रपटात स्क्रीन प्रेझेन्स शेअर केली होती.

कामाच्या आघाडीवर, समंथा रुथ प्रभू गुणशेखर दिग्दर्शित 'शाकुंतलम'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे दोन बहुभाषिक चित्रपट आहेत. तिच्या यादीत The Arrangements Of Love नावाचा हॉलिवूड चित्रपटही आहे. सामंथाने अभिनेत्री तापसी पन्नू निर्मित एक शीर्षक न ठरलेला चित्रपटही साइन केल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा -Shehnaaz Gill Photoshoot : शहनाझ गिलने शेअर केले लेटेस्ट फोटोशूटचे स्टायलिश फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details