महाराष्ट्र

maharashtra

‘चूल आणि मूल’ यात न अडकता शिक्षणाची कास धरलेल्या मुलीची कहाणी, ‘रिवणावायली'!

By

Published : Mar 30, 2022, 7:27 PM IST

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं, एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली या मराटी चित्रपटात मांडण्यात आली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या ऐश्वर्या देसाई या बंडखोर मुलीची ही कथा आहे.

रिवणावायली चित्रपटाचा टीझर
रिवणावायली चित्रपटाचा टीझर

‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, हे जेवढे सत्य आहे तेवढेच स्त्री जितकी शिकलेली असते तितकाच समाज पुढारलेला असतो हे सत्य आहे. परंतु आपल्या देशात अजूनहे स्त्रियांच्या शिक्षणाकडे म्हणावे तेवढेे लक्ष दिले जात नाहीये. त्यातच अनेकदा शिकण्याची तयारी आणि आवड असलेल्या मुलीला डावललं जातं. तिला स्वतःच्या पायावर उभ राहण्याआधीच तिची लग्न लावून देण्यात येते आणि ‘चूल आणि मूल’ यात ती अडकून जाते. अशातच एका बंडखोर तरुणीने आपल्या शिक्षणाची धरलेली कास आणि तिचा शिकण्याचा अट्टाहास याची कथा 'रिवणावायली' मधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं, एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिक अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. उच्च शिक्षण घेऊन आपलं स्वतःच जगात एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या ऐश्वर्या देसाई या बंडखोर मुलीची ही कथा आहे.
रिवणावायली चित्रपटाचे पोस्टर
‘रिवणावायली’ चित्रपटाचा टीझर नुकताच ऑनलाईन प्रदर्शित झाला. एका बंडखोर तरुणीची कथा मांडताना तिला घरातून आणि समाजातून येणारे अडथळे यांची सत्य परिस्थिती हा चित्रपट मांडतो. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे सोलापूर मध्ये झाले असून त्यासाठी निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम यांनी स्वतःहून जातीने या चित्रपटाच्या निर्मितीत पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे. संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत. ‘रिवणावायली’ या चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक, प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत आणि तो येत्या ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details