महाराष्ट्र

maharashtra

'टकाटक'ने मिळवलं 4 आठवड्यात 14 कोटी कलेक्शन, 4 भाषांमध्ये होणार रिमेक

By

Published : Jul 24, 2019, 9:52 AM IST

Updated : Jul 24, 2019, 11:03 AM IST

टकाटक सिनेमाला मिळालेलं यश पाहून आता हिंदी, गुजराती, तमिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये सिनेमाचा रिमेक करण्याचा ऑफर्स निर्मात्यांना मिळाल्या आहेत. नुकत्याच या सिनेमाच्या यशाचं जंगी सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. या सेलिब्रेशन साठी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

टकाटक यशाचं जंगी सेलिब्रेशन

बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे चर्चेत आलेल्या 'टकाटक' या सिनेमाने पहिल्यापासूनच बॉक्स ऑफिस काबीज करून टाकलं. रिलीजच्या तिसरा आठवडा पूर्ण करताना या सिनेमाने 14 कोटी 27 लाख रुपयांच बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळवलं आहे. त्यामुळे हा सिनेमा या वर्षातील आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी मराठी सिनेमा ठरलाय.

सिनेमाला मिळालेलं हे यश पाहून आता हिंदी, गुजराती, तमिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये सिनेमाचा रिमेक करण्याचा ऑफर्स निर्मात्यांना मिळाल्या आहेत. नुकत्याच या सिनेमाच्या यशाचं जंगी सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. या सेलिब्रेशन साठी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सिनेमातील काही सीन्स बोल्ड असले तरीही त्याचा विषय फारच वेगळा होता आणि तोच प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आपण यशस्वी झालो असल्याचं यावेळी सिनेमाचा दिग्दर्शक मिलिंद कवडे याने सांगितलं.

टकाटक यशाचं जंगी सेलिब्रेशन

सिनेमातील प्रथमेश परबने साकारलेला 'ठोक्या' आणि रितिका क्षोत्रीने साकारलेली 'मिनी' या भूमिका आणि त्यांचे संवाद तरुणाईला विशेष अवडलेत. त्यांच्या संवादांना सोशल मीडियावर लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत. तर दुसरीकडे अभिजित आणि प्रणाली यांच्यातली बोल्ड केमिस्ट्री प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्यात यशस्वी ठरली आहे.

तस पहायला गेलं तर मराठीत सेक्स कॉमेडीचा ट्रेंड हळूहळू रूढ व्हायला लागला आहे. 'बॉईज', 'बॉईज टू' त्यानंतर आता 'टकाटक'ला मिळालेलं हे बपंर यश पाहता अशा प्रकारचे अजून काही सिनेमे आपल्या भेटीला येणार एवढं नक्की..पण जे वेब सिरीजमधून राजरोसपणे पहायला मिळत ते सेन्सॉरची बंधनं पाळत सिनेमात दाखवलं गेलं तर त्यात आता प्रेक्षकांनाही काही चुकीचं वाटत नाही हेच या आकड्यांनी दाखवून दिलं आहे.

टकाटकच्या यशानंतर सहाजिकच मराठीतील त्याच्या पार्ट टू ची चर्चाही सुरू झाली आहे. सेलिब्रेशनचा माहौल पाहता ती घोषणाही निर्मात्यांनी करून टाकलीय. त्यामुळे आता वाट पहायची ती 'टकाटक टू'ची

Intro:बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे चर्चेत आलेल्या 'टकाटक' या सिनेमाने पहिल्यापासूनच बॉक्स ऑफिस काबीज करून टाकलं. या सिनेमाने रिलीजच्या तिसरा आठवडा पूर्ण करताना या सिनेमाने 14 कोटी 27 लाख रुपयांच बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळवलं आहे. त्यामुळे हा सिनेमा या वर्षातील आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी मराठी सिनेमा ठरलाय.

सिनेमाला मिळालेलं हे यश पाहून आता हिंदी, गुजराती, तमिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये सिनेमाचा रिमेक करण्याचा ऑफर्स निर्मात्यांना मिळाल्या आहेत. नुकत्याच या सिनेमाच्या यशाचं जंगी सेलिब्रेशन मुंबईत करण्यात आलं. या सेलिब्रेशन साठी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सिनेमातील काही सीन्स बोल्ड असले तरीही त्याचा विषय फारच वेगळा होता आणि तोच प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आपण यशस्वी झालो असल्याचं यावेळी सिनेमाचा दिग्दर्शक मिलिंद कवडे याने सांगितलं.

सिनेमातील प्रथमेश परबने साकारलेला 'ठोक्या' आणि रितिका क्षोत्रीने साकारलेली 'मिनी' या भूमिका आणि त्यांचे संवाद तरुणाईला विशेष अवडलेत. त्यांच्या संवादांना सोशल मीडियावर लाखोंचे व्ह्यूज मिळाले आहेत. तर दुसरीकडे अभिजित आणि प्रणाली यांच्यातली बोल्ड केमिस्ट्री प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्यात यशस्वी ठरली आहे.

तस पहायला गेलं तर मराठीत सेक्स कॉमेडीचा ट्रेंड हळूहळू रूढ व्हायला लागला आहे. 'बॉईज', 'बॉईज टू' त्यानंतर आता 'टकाटक'ला मिळालेलं हे बपंर यश पाहता अशा प्रकारचे अजून काही सिनेमे आपल्या भेटीला येणार एवढं नक्की..पण जे वेब सिरीजमधून राजरोसपणे पहायला मिळत ते सेन्सॉरची बंधनं पाळत सिनेमात दाखवलं गेलं तर त्यात आता प्रेक्षकांनाही काही चुकीचं वाटत नाही हेच या आकड्यांनी दाखवून दिलं आहे.

टकाटकच्या यशानंतर सहाजिकच मराठीतील त्याच्या पार्ट टू ची चर्चाही सुरू झाली आहे. सेलिब्रेशनचा माहौल पाहता ती घोषणाही निर्मात्यांनी करून टाकलीय. त्यामुळे आता वाट पहायची ती 'टकाटक टू'ची

Body:.

Conclusion:.
Last Updated : Jul 24, 2019, 11:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details