महाराष्ट्र

maharashtra

आयफा अवार्ड्स २०१९: आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

By

Published : Sep 19, 2019, 7:54 AM IST

Updated : Sep 19, 2019, 9:10 AM IST

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाच्या 'अंधाधून' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

आयफा अवार्ड्स २०१९: आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबई - सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत मानला जाणारा 'आयफा पुरस्कार २०१९' चा सोहळा मुंबईत रंगला. या पुरस्कार सोहळ्यात 'राझी' चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'पद्मावत' चित्रपटासाठी रणवीर सिंगला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाच्या 'अंधाधून' चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. इशान खट्टरला 'धडक' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू तर, सारा अली खानला केदारनाथ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार मिळाला आहे.


वाचा संपूर्ण यादी -

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - राजी
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - श्रीराम राघवन (अंधाधून)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (पद्मावत)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (राजी)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (संजू)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार - ईशान खट्टर (धडक)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार - सारा अली खान (केदारनाथ)
  • सर्वोत्कृष्ट कथा - श्रीराम राघवन, पुजा लढा सुरती, अरिजीत बिस्वास, योगेश चंदेकर आणि हेमंत राव (अंधाधून)
  • सर्वोत्कृष्ट लिरिक्स - अमिताभ भट्टाचार्य (धडक)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - हर्षदीप कौर आणि विभा सराफ ( दिलबरो-राजी)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग ( ऐ वतन - राजी)
  • सिनेसृष्टीतील योगदान - सरोज खान आणि सय्यद इश्तियाक अहमह

दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला. यामध्ये सलमान खान, विकी कौशल, रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, राधिका आपटे, करण जोहर, आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा- देशमुख, ताहिरा कश्यप, मौनी रॉय, माधुरी दिक्षीत, प्रिती झिंटा आणि इतर कलाकारांचा समावेश होता.

हेही वाचा -तयारीत रहा...'विक्की वेलिंगकर' येतेय तुमच्या भेटीला

यंदा पहिल्यांदाच आयफा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मागच्या वर्षी आयफा पुरस्कार बँकॉक येथे पार पडला होता.

हेही वाचा -...म्हणून आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करणं सारा अली खानसाठी असणार खास

Intro:Body:Conclusion:
Last Updated :Sep 19, 2019, 9:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details