महाराष्ट्र

maharashtra

उर्वशीचे इंस्टाग्रामवर ३ कोटी फॉलोअर्स, बिग बी आणि शाहरुखलाही टाकले मागे

By

Published : Aug 26, 2020, 7:37 PM IST

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे इन्स्टाग्रामवर तब्बल ३ कोटी फॉलोअर्स झाले आहे. याबाबतीत तिने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनाही पिछाडीवर टाकले आहे.

Urvashi
उर्वशी रौतेला

मुंबई - अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे आता इंस्टाग्रामवर ३ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. तिने चाहत्यांना धन्यवाद देणारी चिठ्ठी लिहून हा आनंद साजरा करणारा एक व्हिडिओ कोलाज पोस्ट केला आहे.

उर्वशीने लिहिले, "इंस्टाग्रामवर ३ कोटी फॉलोअर्सचे आभार. धन्यवाद दोस्तांनो. माझ्या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग बनल्याबद्दल धन्यवाद. माझ्या आयुष्यात येऊन मला आनंदित केल्याबद्दल धन्यवाद. मला प्रेम दिले आणि बदल्यात माझे प्रेम स्वीकारले यासाठी सर्वांचे आभार. सुंदर आठवणी दिल्याबद्दल मी नेहमीच आभारी आहे. "

माझे डोके ठेवण्यासाठी तुम्ही खांदा पुढे केलात त्याबद्दल धन्यवाद. प्रेम देणाऱ्या सर्व चाहत्यांचे तिने आभार मानले आहेत.

याबरोबरच उर्वशीने फॉलोअर्सच्या बाबतीत अमिताभ बच्चन (२.२१ कोटी) आणि शाहरुख खान (२.२24 कोटी) यांना मागे टाकले आहे.

पहिली तेलुगू फिल्म 'ब्लॅक रोज' च्या शूटिंगच्या संदर्भात उर्वशी रौतेला अभिनेत्री सध्या हैदराबादमध्ये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details