महाराष्ट्र

maharashtra

Eco friendly Ganesha : शरद केळकरने फक्त 10 मिनीटांत बनवला इको फ्रेंडली बाप्पा

By

Published : Sep 6, 2021, 6:52 AM IST

सर्वसामान्यांपासून ते फिल्मी कलाकारांपर्यंत सर्वांचा गणपती बाप्पा लाडका आहे. अभिनेता शरद केळकरने स्वतः इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनविली आहे आणि ती सुद्धा फक्त 10 मिनिटांत. फक्त अभिनयातच नाही, तर कलेतही तो निपून असल्याचे दिसून आले.

Sharad Kelkar has made Eco friendly Ganesha
शरद केळकरने फक्त 10 मिनीटांत बनवला इको फ्रेंडली बाप्पा

मुंबई -गणेशोत्सव हा सण दरवर्षी देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने भाविक गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्यांची मनोभावे पूजा करतात. बाप्पाच्या आगमनाची वेळ जवळ आली की सर्वच ठिकाणी उत्साहाचे वातावरण असते. हल्ली गणपती बाप्पाच्या मूर्ती ‘इको-फ्रेंडली’ बनवण्याकडे कल आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी यावर्षी तर 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्ती बनवण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती आहे. सर्वसामान्यांपासून ते फिल्मी कलाकारांपर्यंत गणपती बाप्पा सर्वांचा लाडका आहे. अभिनेता शरद केळकरने स्वतः इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनविली आहे आणि ती सुद्धा फक्त 10 मिनिटांत. फक्त अभिनयातच नाही, तर कलेतही तो निपून असल्याचे दिसून आले.

या कलाकारीमध्ये त्याला शिल्पकार, क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळेचं मार्गदर्शन लाभलं.

लवकरच अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान होणार आहेत. बाप्पा आला म्हणजे सजावट, आनंदी वातावरण, नैवेद्य आणि मोदक हे आलेच. परंतु या आधी सर्वात पहिला विचार अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे ‘यंदाच्या वर्षीचा माझा बाप्पा कसा असायला हवा?’ असाच विचार अभिनेता शरद केळकर याने पण केला. दरवर्षी असलेला शरद केळकरचा उत्साह आणि आनंद यावर्षी दुप्पटपटीने वाढला आहे आणि त्याचे कारणही विशेष आहे.

शरद केळकरने स्वतः इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती बनवली.

ते विशेष कारण असे की, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचा वापर करण्याचे शरदने ठरवले होते. मात्र, यावेळी त्याने स्वत:च्या हाताने घरी बाप्पाची इको फ्रेंडली मुर्ती बनवली आणि ती देखील फक्त 10 मिनिटांतच. 10 मिनिटांमध्ये बाप्पाची मूर्ती बनवणं हे शक्य तरी आहे का, हा विचारच मुळात सोप्पा वाटत नाही. पण शरद केळकरने ते शक्य करुन दाखवलं. दमदार आवाज आणि जबरदस्त अभिनय अशी शरद केळकरची ओळख, मात्र हा आता त्याच्यातील सुप्त गुण बाप्पाच्या निमित्ताने सर्वांना कळलाय.

प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात शरद केळकरचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

प्रसिद्ध शिल्पकार आणि क्ले आर्टिस्ट शुभांकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद केळकरने बाप्पाची ही इको-फ्रेंडली मुर्ती बनवली आहे. शुभांकर कांबळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शरद केळकर त्याच्या हाताने गणरायाची मुर्ती घडवताना दिसत आहे. प्रत्येक गणेशोत्सवाच्या काळात शरद केळकरचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

हेही वाचा -अजय देवगननंतर अक्षय कुमारसोबत झळकणार शरद केळकर, शेअर केला अनुभव

ABOUT THE AUTHOR

...view details