महाराष्ट्र

maharashtra

"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच.. मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा"

By

Published : Sep 4, 2020, 4:25 PM IST

Updated : Sep 4, 2020, 4:57 PM IST

कंगना रणौतने मुंबईत येत असून कुणाच्या बापाच्यात हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर ट्विटरवर युध्द सुरू झाले असून "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...असे म्हणत कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले आहे.

sanjay raut react on Kangana tweet
राऊतांचे कंगनाला प्रत्यूत्तर

मुंबई - कंगनाच्या वादग्रस्त विधानाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिलंय, "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र"

संजय राऊत यांनी हे ट्विट कंगनाने केलेल्या ट्विटला प्रत्यूत्तर आहे. कंगना ९ तारखेला मुंबईत परतणार आहे. कुणाच्या बापाच्या हिंमत असेल तर रोखून दाखवावे असे तिने या ट्विटमध्ये म्हटले होते.

तिने लिहिले होते, ''बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत ​​आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा मी वेळ पोस्ट करते. किसी के बाप में हिम्मत है तो रोक ले.''

यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला थेट थप्पड मारण्याची धमकी दिली आहे. शिवसेनेसोबतच मनसेही आक्रमक झाली असून कंगनाच्या या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Last Updated :Sep 4, 2020, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details