महाराष्ट्र

maharashtra

जॅकलिनने सांगितले सलमानच्या 'झोपे'चे गुपित

By

Published : Feb 4, 2020, 8:05 PM IST

जॅकलिन फर्नांडिसने किक सिनेमाचा को-स्टार सलमान खानला सल्ला दिलाय तो अथक काम करीत असतो तेव्हा त्याने विश्रांती घेण्याची गरज असल्याचे सांगितलंय.

Jacqueline reveals Salman's secret
जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खान


भोपाळ - अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खानने यापूर्वी सिनेमात एकत्र काम केले आहे. तिने सलमानची काही गुपिते उघड केली आहेत.

''मला जे माहिती आहे ते आणखी कुणाला माहिती असेल असे मला वाटत नाही. परंतु मी त्याच्यासोबत काम केल्यामुळे मला माहिती आहे की, तो झोपेसाठी वेळच काढत नाही.'', असे जॅकलिनने सांगितले.

''तो सकाळी काम करतो, दुपारी आणि रात्रीही कामातच असतो. तो एक तर विमानात असतो, किंवा नाहीतर बिग बॉसच्या शूटींगमध्ये असतो किंवा गाण्याच्या शूटींगमध्ये असतो. तो नेहमी कामात असतो,'' असे सांगत तिने सलमान बिग बॉसमध्ये कसा बिझी आहे, याचा खुलासा केला.

तिने सलमानला सल्लादेखील दिलाय, ''ती म्हणते, प्लिज थोडी विश्रांती घे.''

भोपाळच्या भेटीसाठी जॅकलिन खूप उत्साहित दिसत होती. विमानतून तिने घेतलेले भोपाळच्या सिटी ऑफ लेक्सचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हा तलाव स्वच्छ आणि सुंदर असल्याचे तिने म्हटलंय. आयफा अवॉर्ड्स २७ ते २९ मार्चला मध्य प्रदेशमध्ये होणार आहे.

आयफा अवॉर्ड २०२० चे होस्ट म्हणून सलमान खान आणि रितेश देशमुख काम पाहाणार आहेत. यात जॅकलिनसह कॅटरिना कैफही गाण्यावर थिरकताना दिसेल. अरजित सिंग, जोनिता गांधी, शाल्मली खोलगडे, बेनी दयाल, जुबिन नौटियाल अशा अनेकांचे यावेळी परफॉर्मन्स होणार आहेत.

Intro:Body:

ent news


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details