महाराष्ट्र

maharashtra

डॉक्टर अन् नर्सेस म्हणजे, ''पूजा-दर्शनाच्या स्थानी फडकणारे मानवतेचे झेंडे'' - अमिताभ बच्चन

By

Published : Jul 15, 2020, 5:25 PM IST

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांबद्दल आभार मानल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून डॉक्टर आणि परिचारिकांच्या मानवतेच्या अखंड मनोवृत्तीचा आदर केला.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन

मुंबई - कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल झालेले अमिताभ बच्चन उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आहे. मंगळवारी ज्येष्ठ अभिनेत्याने सोशल मीडियावरुन डॉक्टर आणि परिचारिकांसाठी कृतज्ञतापूर्वक पोस्ट लिहिली आहे.

मदतीसाठी सरसावलेल्या हाताचा एक फोटो शेअर करत बच्चन यांनी हिंदीमध्ये एक सुंदर कविता लिहिली आहे. पांढरे वस्त्र परिधान करुन, सेवेसाठी समर्पित असलेल्या, देवांचा अवतार असलेल्या, पीडितांचे साथीदार असलेल्या, ज्यांनी त्यांचा अहंकार मिटवलाय, आमच्या काळजीसाठी त्यांनी हे स्वीकारलंय, पूजा-दर्शनाच्या ठिकाणी असलेल्या या सेवेकऱ्यांनी मानवतेचा झेंडा फडकवत ठेवलाय, अशा अर्थाची ही कविता आहे.

शनिवारी ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक यांचे कोविड -१९ चे पॉझिटिव्ह निदान झाले. रविवारी अॅन्टीजेन चाचणीनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चनही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.

हेही वाचा - बच्चन कुटूंबीयांच्या संपर्कात असलेले 26 जण कोरोना 'निगेटिव्ह'

अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत, तर ऐश्वर्या आणि आराध्याला घरी अलग ठेवण्यात आले आहे.

तत्पूर्वी, अमिताभ यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले होते.

दरम्यान, बच्चन बंगल्यात काम करणाऱ्या 26 उच्च जोखमीच्या कर्मचार्‍यांचीही कोविड -१९ ची चाचणी घेण्यात आली होती आणि त्यांच्या अहवालानुसार व्हायरस निगेटिव्ह असल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details