महाराष्ट्र

maharashtra

कंगनाला कोरोनाची लागण, म्हणाली- मी कोरोनाला नष्ट करेन, आपण याचा सामना करु

By

Published : May 8, 2021, 1:05 PM IST

Updated : May 8, 2021, 1:29 PM IST

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिने तिच्या फेसबुक वॉलवरून याची माहिती दिली. मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले असल्याचेही तिने स्पष्ट केले.

कंगना राणावत
कंगना राणावत

मुंबई -आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणावत हिला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज तिने फेसबुकवरून ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नव्हती तसेच डोळ्यांना आग होत होती. हिमाचलला जाण्यासाठी मी टेस्ट केली असता काल त्याचे रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आले. मला कोरोनाची बाधा झाल्याचेही तिने सांगितले.

मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे. हा व्हायरस माझ्या शरीरात किती काळ राहील हे सांगता येणार नाही. मला माहीत आहे. मी या व्हायरसला नष्ट करेन. जर तुम्ही घाबरलात तर तो विषाणू तुम्हाला जास्त घाबरवेल. चला आपण एकत्र येत याचा सामना करू. हा छोट्या प्रकारचा ताप असून अनेकांना त्रास देत आहे. हर हर महादेव. अशा आशयाचा संदेश टाकत चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. नुकतेच बंगालमधील हिसंचाराबद्दल केलेल्या विधानामुळे तिचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

Last Updated : May 8, 2021, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details