महाराष्ट्र

maharashtra

Meta Layoff : मेटा पुन्हा नोकर कपातीच्या तयारीत, दुसऱ्या फेरीत 10 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

By

Published : Mar 15, 2023, 6:17 PM IST

मेटाने आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना मागील वर्षी घरचा रस्ता दाखवला होता. यावर्षीदेखील मेटा आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचे कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे मेटाच्या आणखी १० हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

Meta Layoff
संग्रहित छायाचित्र

वॉशिंगटन : मार्क झुकेरबर्गने मेटाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मेटाने मागील वर्षी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा मेटा आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची घोषणा कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये केली आहे. या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याच्या वृत्ताची मार्क झुकेरबर्ग यांनी देखील पुष्टी केली आहे. एप्रिलमध्ये या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर नवीन भरती सुरू करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीने पाठवला कर्मचाऱ्यांना ईमेल :मेटाने आपल्या १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याबाबतचा ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनी आगामी एप्रिल महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण करणार आहे. त्यानंतर कंपनी वर्षभर कर्मचारी काढण्याची प्रक्रिया राबवणार असल्याचेही कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने रिकाम्या असलेल्या ५ हजार जागांवरही अद्याप कोणतीही भरती केली नाही. त्यामुळे ती भरतीही करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कंपनीने आपल्या आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याने आता कंपनीचे काम चांगलेच बाधित होणार असल्याचेही बोलले जात आहे.

आतापर्यंत २ लाख ८० हजार कर्मचाऱ्यांना नारळ :जगभरात आलेल्या मंदिचा फटका मेटाला चांगलाच बसला आहे. त्यामुळे मेटाने आतापर्यंत आपल्या २ लाख ८० हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्याचा अहवाल विविध वेबसाईटने दिला आहे. त्यातील ४० टक्के यावर्षी काढण्यात आले असल्याचेही या साईटने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. कोरोना लॉकडाऊननंतर मेटा महागाई आणि वाढत्या व्याज दरांचा सामना करणाऱ्या कंपनींच्या जाहिरातीच्या खर्चात सातत्याने घसरणीचा सामना करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही मेटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - NASA Captures Star On Cusp Of Death : मृत्यूच्या उंबरठ्यावरील तारा नासाच्या दुर्बिणीत झाला कैद

ABOUT THE AUTHOR

...view details